Agitation Canva
सोलापूर

"उजनीप्रकरणी समिती म्हणजे शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचे षड्‌यंत्र!'

उजनीच्या पाण्यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनात देशमुख कुटुंबीयांचाही सहभाग

राजकुमार शहा

देशमुख म्हणाले, पालकमंत्री भरणे यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी उचलून इंदापूर तालुक्‍याला देण्याचा घाट घातला आहे. असे झालेच तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.

मोहोळ (सोलापूर) : पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांनी उजनीतील (Ujani Dam) पाच टीएमसी पाणी पळविल्या प्रकरणाबाबतचा लढा आता वरचेवर तीव्र होत असून, जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh, President of Janhit Shetkari Sanghatana) यांच्या पत्नी व मोहोळ पंचायत समितीच्या माजी उपसभापती साधना देशमुख, देशमुख यांचे चिरंजीव शंभूराजे देशमुख यांच्यासह अन्य महिलाही उपोषणात सहभागी झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची (Agitation) शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने शासना विरोधात शेतकऱ्यांचा मोठा रोष वाढत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा पाच टीएमसी पाण्याबाबतचा आदेश रद्द करावा, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उजनीतील पाणी पूर्वीप्रमाणेच बारमाही द्यावे, अशा मागण्या देशमुख यांनी केल्या आहेत. दरम्यान, या पाणीप्रकरणी तीन सदस्यीय समिती नेमणे म्हणजे निव्वळ शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचे षड्‌यंत्र असल्याचे देशमुख यांनी सांगितले. (Prabhakar Deshmukh family also participated in the ongoing agitation regarding Ujani water)

या वेळी प्रभाकर देशमुख म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी उचलून इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी तातडीने 600 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. असे झालेच तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे, तर पाण्याची एक पाळी न मिळाल्यास हातची पिके व फळबागा धोक्‍यात येणार आहेत. फळबागा व उसावर शेतकऱ्यांनी मोठी कर्जे काढली असून, ती जमिनी विकूनच भरण्याची वेळ येणार आहे.

दरम्यान, या पाच टीएमसी पाणी प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकरी एकवटल्याचा धसका घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाच टीएमसी पाण्याबाबतचा आदेश रद्द केल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले. मात्र अधिक चौकशी केली असता केवळ सर्वेक्षणाचा आदेश रद्द केला आहे, त्यामुळे शेतकरी गप्प बसतील, हा त्यामागचा त्यांचा गैरसमज आहे. मात्र मूळ आदेश तसाच असल्याने भविष्यात पाणी उचलण्याचे धाडस ही नेतेमंडळी करणार आहेत, ही गोष्ट शेतकऱ्यांच्या आता लक्षात आली आहे. उजनी धरणाचे निर्माते स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूर जिल्हा सुजलाम्‌- सुफलाम्‌ व्हावा व शेतकऱ्यांच्या जीवनात खरी हरितक्रांती व्हावी या उद्देशाने या धरणाची निर्मिती केली आहे. ते पूर्ववत म्हणजे हे धरण बारमाही करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.

श्री. देशमुख म्हणाले, वस्तुस्थितीचा अभ्यास करण्यासाठी व ती जनतेसमोर मांडण्यासाठी शासनाने उपसचिव यांच्या अधिपत्याखाली तीन सदस्यीय समिती नेमली आहे. समिती नेमणे म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धूळफेक आहे. उजनीच्या पाण्याचे यापूर्वीच कायदेशीर योग्य वाटप झाले आहे, अधिकाऱ्यांनाही हे माहीत आहे, यापेक्षा अधिकारी वेगळे काय सांगणार आहेत, ही गोष्टही शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. विविध शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर न्यायालयीन लढ्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींनी ठरावही दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT