Praniti Shinde esakal
सोलापूर

Praniti Shinde : सभा उधलेल्या गावातच प्रणिती शिंदेला मताधिक्य

तालुक्यात 11 गावे वगळता सर्वच गावातून प्रणिती शिंदे या आघाडीवर राहिल्या.

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी गावभेट दौय्रात मराठा आरक्षण प्रश्नावरून आ. प्रणिती शिंदे यांना सभा घेण्यास मज्जाव करणाऱ्या पाठखळ गावातून 307 मताचे मताधिक्य मिळाले. तालुक्यात 11 गावे वगळता सर्वच गावातून प्रणिती शिंदे या आघाडीवर राहिल्या.

लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रणिती शिंदे यांनी संभाव्य काँग्रेसच्या उमेदवार म्हणून गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले त्यामध्ये पहिल्याच दौऱ्यात पहिल्याच गावात पाटकळ येथे त्यांना मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट नसल्यामुळे आम्ही नेत्याला गावबंदी केली असल्याचे सांगत त्यांना सभा घेण्यास मज्जाव केला त्यानंतर त्यांनी सभा न घेता ग्रामस्थ संवाद करून पुढच्या दौऱ्याला मार्गस्थ झाल्या एकूणच त्यांच्या मंगळवेढा दौऱ्यात फक्त पाटकळ येथे त्यांना विरोधात सामोरे जावे लागले मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाटखळ गावाने प्रणित शिंदे यांना 307 मताचे मताधिक्य मिळत चार बुथवर 1178 इतकी मते तर भाजपचे राम सातपुते यांना 871 इतकी मते मिळाली.

लोकसभा निवडणूक या दौऱ्या दरम्यान त्यांनी पाणी प्रश्नावरून रान उठवले तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न देखील उपस्थित केला होता. आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाने मंत्रिमंडळाची मान्यता दिलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या 24 गावात देखील भाजपच्या उमेदवाराला अपेक्षित मताधिक्य मिळालेले नाही. लेंडवे चिंचाळे, खुपसंगी, हाजापूर, जालीहाळ, भाळवणी, नंदेश्वर, भोसे, शिरसी, गोणेवाडी, रड्डे ,निंबोणी, येड्राव खवे, जित्ती, आंधळगाव, लक्ष्मीदहिवडी पाठखळ, खडकी, सिध्दनकेरी, जुनोनी, या गावात देखील या योजनेच्या मंजुरीचा फायदा भाजप उमेदवाराला झाला नाही. एकमेव प्रदीप खांडेकर यांच्या गावात भाजपचा उमेदवार आघाडीवर राहिला ज्या पद्धतीने ही योजना मंजूर झाल्याचे भाजपच्या नेत्याकडून सांगण्यात येत होते मात्र या योजनेसाठी आवश्यक असणारा बॅरेजेस वगळून ही योजना चुकीच्या पद्धतीने मंजुरी दिली असा प्रचार या निवडणुकीदरम्यान करण्यात आला. राजकीय व्यासपीठावर अनेक वर्ष तरंगत राहिलेला या योजनेबद्दल लोकांची विश्वासार्हता निर्माण करण्यात सत्ताधारी पक्ष देखील कमी पडला उलट विरोधी पक्षाने त्याचे योग्य भांडवल करत त्याचे रूपांतर मतात करण्यात यशस्वी ठरला

जिथं पाणी साठवू शकत नाही तेच पाणी शेतीला कसे पुरवणार मूळ अंदाजपत्रक असलेला बॅरेज नव्या नव्याने मंजुरी देताना त्यामध्ये समावेश केला नाही त्यामुळे या योजनेतून या भागातील जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे शासनाने पाणी साठवण्यासाठी बॅरेजचा समावेश करणे आवश्यक आहे अन्यथा त्याचे परिणाम विधानसभेला देखील होऊ शकतात.

- पांडुरंग चौगुले आंदोलक पाणी चळवळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT