Prashant Paricharak criticize sugar factory president who want to be MLA election solapur  sakal
सोलापूर

कारखान्याच्या अध्यक्षांनी आमदारकीच्या नादाला लागू नये - प्रशांत परिचारक

हल्लीच्या काळात साखर कारखान्याच्या अध्यक्षाला आमदार होण्याचे स्वप्न पडू लागली.मात्र कारखानदारी जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने कृपा करून तुम्ही जिल्हा परिषद व आमदारकीच्या नादाला लागू नका असा सूचक इशारा

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : हल्लीच्या काळात साखर कारखान्याच्या अध्यक्षाला आमदार होण्याचे स्वप्न पडू लागली.मात्र कारखानदारी जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने कृपा करून तुम्ही जिल्हा परिषद व आमदारकीच्या नादाला लागू नका असा सूचक इशारा आमदार प्रशांत परिचारक यांनी दामाजी कारखान्याच्या नवनियुक्त संचालक मंडळातील शिवानंद पाटील यांना दिला. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून या निवडणुकीत भालके व परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समविचारी पॅनलच्या माध्यमातून सत्ताधारी गटाचा पराभव केल्यानंतर पराभव केला व निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व संचालकांचा प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर येथे सत्कार केला.

समविचारी गटातून दामाजीच्या अध्यक्षपदासाठी शिवानंद पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे त्यामुळे परिचारकांचा हा सल्ला साखर कारखान्याच्या अध्यक्षासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे.सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, माढा, माळशिरस, हा पट्टा ऊस उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाऊ लागला या पट्ट्यामध्ये असलेल्या साखर कारखान्याचे अध्यक्षच आमदारकीचे उमेदवार म्हणून पुढे आले. मात्र आमदारकीच्या नादामुळे साखर कारखानदारी चांगली चालवण्यासाठी लक्ष देण्यासाठी कमी वेळ मिळाला.परिणामी सध्या साखर कारखानदारीही अडचणीत आहे. अडचणीतली साखर कारखानदारी बाहेर काढण्याचे दृष्टीने कारखान्याच्या अध्यक्षांनी जिल्हा परिषद व आमदारकीची निवडणूक लढवू नये असे सांगताना सर्व संचालक मंडळांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे असून त्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी कारखान्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या वाट आहे एकत्र झाले पाहिजे.

कारखान्यात पूर्ण वेळ लक्ष देऊन कामकाज केले पाहिजे एमडी व अकौटंट वर अवलंबून राहता कामा नये.कारखान्यावरील कर्जाची परतफेड करत असताना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे पाच लाखापेक्षा अधिक गाळप करण्यासाठीचे नियोजन, सभासदांना विश्वासात घेताना कर्मचाऱ्यांशी समोपचाय्राशी संबंध ठेवून कारखानदारी कशी चालवता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले व स्व. सुधाकरपंत परिचारक, स्व. औदुंबर (आण्णा) पाटील व आप्पासाहेब काडादी यांनी कारखानदारी कशा पद्धतीने काटकसरीने चालवली याची उदाहरणे देऊन त्यांना एक दिलाने एकजुटीने कामकाज करण्याचा सल्ला देत तालुक्यातील वरिष्ठ मंडळी आपल्या बरोबर असल्याचे त्यांनी यावेळी सांगताना दामाजी कारखान्याची निवडणूक लढण्यावर माझा तर विरोध होता परंतु काहींना निवडणूक लढण्याचा आग्रह होता. दामाजीच्या नवनियुक्त संचालक मंडळाचे प्रशांत परिचारक यांनी आज कारखानदारी चालवण्याविषयी शिकवणी घेतली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT