Ketan Waghmare sakal
सोलापूर

Solapur News : काळ्या तिखटाच्या संशोधनातून केतन वाघमारेंची उत्पादन निर्मिती

काळे तिखट बनवण्याची मागील पिढीतून हरवलेली परंपरा, बदललेले स्वरूपावर संशोधन करत येथील केतन वाघमारे यांनी काळ्या तिखटाच्या मुळ परंपरेवर आधारित उत्पादन बाजारात आणले.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - काळे तिखट बनवण्याची मागील पिढीतून हरवलेली परंपरा, बदललेले स्वरूपावर संशोधन करत येथील केतन वाघमारे यांनी काळ्या तिखटाच्या मुळ परंपरेवर आधारित उत्पादन बाजारात आणले. या उद्योगातून त्यांनी १४ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

केतन वाघमारे हे मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. पुण्यात नोकरी करत असताना कोरोनात ते सोलापुरात परत आले. तेव्हा काळ्या तिखटावर अभ्यास सुरु केला. तेव्हा त्यांना आढळले की काळे तिखटाची परंपरा अनेक पिढ्यांपासून बदलत गेली आहे. प्रत्येक पिढीत ती बदलली गेली. त्यामुळे काळ्या तिखटाच्या चवीत देखील बदल झाला.

काळे तिखट तेलकट असावे, ते झणझणीत असावे, खमंग ऐवजी तिखट असावे या अपेक्षानुसार त्याचे स्वरूप बदलत गेले. परंपरेतील काही बदल अगदी समूहानुसार देखील झाल्याचे दिसून आले. मग त्याचे मूळ स्वरूप काय होते याचा शोध सुरू झाला. त्याचे विश्लेषण करून त्याच्या मुळ पारंपारिक स्वरूपाचे फॉर्म्युलेशन निश्चित करण्यात आले.

त्यानंतर काळ्या तिखटातील घटक पदार्थासाठी केरळातील मसाला उत्पादकांशी संवाद साधत रसायनमुक्त मसाले मिळवले गेले. त्यानंतर काळे तिखट बनवण्याची पारंपरिक पद्धत देखील अवलंबण्यात आली.

केतन वाघमारे यांना विशाल वाघमारे यांचे आर्थिक व मार्गदर्शनाचे पाठबळ दिले. या पद्धतीने घरगुती पध्दतीचे काळे तिखट बाजारात आणण्याची तयारी करण्यात आली. आता उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. काही महिन्यापूर्वी या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ मिळू लागल्याने हा उद्योग स्थिरतेकडे झुकला आहे.

ठळक बाबी

- आधी परंपरांचे मूळ स्वरूप शोधण्यासाठी संशोधन

- उत्पादन घटकांच्या गुणवत्तापूर्ण निर्मितीचा शोध

- भरपूर संशोधनानंतर नवे उत्पादन फार्म्युलेशनचे काम

- केवळ काळ तिखटाचे विक्री केंद्र स्थापन

- एकूण १४ जणांना थेट रोजगार

- पारंपरिक काळ्या तिखटाचे तेलकटपणा, कुबट वास येणे हे दोष संपवले

- पॅकिंगच्या पद्धतीवर संशोधन करून काचेच्या बरणीच्या पर्यायाची निवड

स्टार्टअपमधून विकसित केलेली मूल्ये

- पारंपरिक उत्पादनाच्या मुळ स्वरूपाचा अभ्यास व संशोधन

- संशोधनानंतर उत्पादनातील घटकांचा गुणवत्तापूर्ण पुरवठा मिळवला

- निर्मितीची पद्धतीत जपली पारंपरिकता

- बाजारातील अन्य उत्पादनात येणारे दोष घालवून गुणवत्तेत वाढ

- बाजारात स्वतःचे दुकान टाकून विक्रीचा पर्याय

- ऑनलाईन बाजारातून विक्रीची मिळवली वाढ

काळे तिखट ही सोलापूरची परंपरा असली तरी त्यातही परंपरेचे अस्सलपणा नेमका काय आहे हे समजून उत्पादन घेतले. त्यामुळे त्याला अर्थातच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. स्थानिक स्पर्धेतील गुणवत्तेचे वेगळेपण ऑनलाईन बाजारात प्रतिसाद देणारे ठरले.

- केतन वाघमारे, संचालक, ॲनिसियन्ट ॲरोमाज, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT