सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट व अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. त्यानंतर लगेचच रविवारी (ता. ४) मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेने विचारविनिमय बैठक घेत निवडणुकीची दिशा निश्चित केली. पदवीधर वगळता सिनेट व अधिसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
रंगभवनजवळील समाज कल्याण केंद्रात रविवारी मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची बैठक पार पडली. त्यावेळी विद्यापीठाची ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व्हावी, अशी आपली भूमिका असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्राम सलवदे यांनी स्पष्ट केले. सोलापूर विद्यापीठ मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेने वालचंद शिक्षण
समूह, संगमेश्वर समूह आणि सिंहगड समूह या संस्थांशी चर्चा करून त्यांच्याशी आघाडी करून निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्याचेही डॉ. सलवदे यांनी यावेळी सांगितले.
संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी निवडणुकीच्या संदर्भात जनजागृती करावी, असे आवाहन केले. बैठकीसाठी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. विलास अंधारे, प्रा. परमेश्वर हटकर,
डॉ. मारोती घंटेवाड, प्रा. मनोज कसबे, डॉ. संजय गायकवाड यांच्यासह शहर-जिल्ह्यातील जवळपास ३५ महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, पुढील आठ दिवसांत सुटा संघटनेसह राजकीय पक्षांच्या माध्यमातून कोण-कोण निवडणूक लढविणार, निवडणुकीसाठी किती पॅनेल असतील, या बाबी समोर येणार आहेत.
बिनविरोधसाठी ‘सुटा’कडून प्रतिसाद नाही
विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून दहा, संस्था प्रतिनिधीतून सहा, शिक्षकांमधून दहा, पदवीधरमधून दहा आणि विद्यापीठ शिक्षकांमधून तीन सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी २९ सप्टेंबरला निवडणूक आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची आहे. पण, ‘सुटा’ संघटनेकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.