alcohol sakal media
सोलापूर

‘राज्य उत्पादन शुल्क’तर्फे धाब्यांवर धाडी! हॉटेल मालकाला २५००० तर मद्यपींना २००० दंड

बुधवारी सोलापूर-पुणे व विजयपूर महामार्गावरील ढाब्यांवर छापे टाकून ढाबा चालकांसह त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या १० मद्यपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एकूण ७० हजारांचा दंड ठोठावला.

तात्या लांडगे

सोलापूर : हॉटेल तथा ढाब्यांवर बसून विनापरवाना दारू पिणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरूच आहे. बुधवारी (ता. २१) रात्रीच्या सुमारास सोलापूर-पुणे व विजयपूर महामार्गावरील ढाब्यांवर छापे टाकून ढाबा चालकांसह त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या १० मद्यपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एकूण ७० हजारांचा दंड ठोठावला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख यांच्या पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे परिसरातील हॉटेल सोलापुरी भाऊ या ढाब्यावर छापा टाकून चालक महंमद फिरोज सिद्दीकी याच्यासह दहा जणांना अटक केली. तसेच दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने विजयपूर रोडवरील सैफुल परिसरातील हॉटेल जगदंबा येथे छापा टाकून चालक दत्तात्रय कुंडलिक झोडे याच्यासह त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच मद्यपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २२) एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र दारूबंदी न्यायालयात दाखल केले. न्यायाधीश नम्रता बिरादार यांनी तत्काळ निकाल देत ढाबा चालकांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

यांच्या पथकाने केली कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपआयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख, उषाकिरण मिसाळ, जवान शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

विनापरवाना मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हे

हॉटेल, ढाबा किंवा बाहेर कुठेही विनापरवाना मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यासाठी मद्यपींनी रीतसर दारू पिण्याचा परवाना काढणे अपेक्षित आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने १२ महिन्यांत विनापरवाना मद्यपान करणाऱ्या शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना दारूबंदी न्यायालयाने प्रत्येकी दोन ते पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT