Train 
सोलापूर

सोलापूर-हसन एक्‍स्प्रेसचा हटके लूक ! "सोलापूर-सिद्धेश्‍वर'नंतर दुसरी एक्‍सलंट रेल्वे

विजय थोरात

सोलापूर : सोलापूर-हसन एक्‍स्प्रेसच्या रेकमध्ये अत्याधुनिक पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. सोलापूर विभागातून धावणाऱ्या सोलापूर - सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसनंतर एक्‍सलंट म्हणून सोलापूर - हसन एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी बदल करण्यात आले आहेत. 

या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर, आनंदी होणार आहे. या गाडीत बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये टॉयलेटमध्ये टाइल्स बसविण्यात आले आहेत. याचे काम सोलापूर येथील आयओएच डेपोत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. 

सध्या मध्य रेल्वेमध्ये सोलापूर- सिद्धेश्वर एक्‍स्प्रेसचे डबे सुविधाअंतर्गत एक्‍सलंट बनविण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर - हसन एक्‍स्प्रेसच्या डब्यात देखील आतमधून सोयी-सुविधा व सौंदर्यीकरणाची सुधारणा झाली आहे. सोलापूर - हसन एक्‍स्प्रेसचे काम पूर्ण झाल्याने सध्या सोलापूर रेल्वे स्थानकावरून सोलापूर - हसन एक्‍स्प्रेसचा रेक उत्कृष्ट होऊन प्रवाशांच्या सेवेत धावत आहे. या गाडीला हटके लूक देण्याचे काम सोलापूरच्या यांत्रिक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे. 

असे असणार एक्‍सलंट डबे 

  • दुर्गंधी नियंत्रण करणारी यंत्रणा 
  • एलईडी लाईट, एलईडी घड्याळ बसविले आहे 
  • पर्यटनवाढीसाठी त्या-त्या ठिकाणांचे बोर्ड लावले आहेत 
  • वाय-फाय किट 
  • डब्याच्या आतमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे टॉयलेट 
  • अत्याधुनिक आसन व्यवस्था 
  • विशिष्ट प्रकारचे आकर्षक रॅपिंग 
  • एडमिन पेंटिंग 
  • डब्यांच्या तुलनेने अतिशय वेगळी असणार पेंटिंग्ज 

एक्‍सलंट सुविधायुक्त सोलापूर विभागातील दुसरी रेल्वे 
सोलापूर- हसन एक्‍स्प्रेसच्या डब्यांच्या आधुनिकीकरणाबरोबरच आतील सुविधा वाढविण्यात आलेल्या आहेत. मध्य रेल्वेच्या निवडक गाड्यांना एक्‍सलंट करण्यासाठी काम केले आहे. सोलापूर- सिद्धेश्वर एक्‍स्प्रेसचा रेक उत्कृष्ट पद्धतीने बनविण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर विभागातील सोलापूर- हसन एक्‍स्प्रेसचा रेक देखील उत्कृष्ट बनविण्यात आला आहे. सोलापूर- सिद्धेश्वर एक्‍स्प्रेसनंतर सोलापूर- हसन एक्‍स्प्रेस सोलापूर विभागातील उत्कृष्ट सुविधेत समावेश झालेली दुसरी रेल्वे असणार आहे. 

उत्कृष्ट रेक अंतर्गत प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी होणार आहे. प्रवाशांनी सुद्धा या सुविधा व्यवस्थित राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. 
- प्रदीप हिरडे, 
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme :आली मोदी सरकारची मोठी स्कीम! पालकांसह करा मुलांच्याही भविष्याची तरतूद! कसा करायचा NPSचा अर्ज?

Atishi Marlena Saree Collection: ऑफिसमध्ये हवाय क्लासी अन् फॉर्मल लूक, 'आतिशी' यांच्या साड्यांना द्याल पहिली पसंती

Ganesh Visarjan 2024 LIVE : हैद्राबादमध्ये गणेश विसर्जनाचा उत्साह, पाहा व्हिडिओ

Virat-Gambhir Viral Interview : विराट कोहलीचा 'ॐ नमः शिवाय' चा जप अन् गौतम गंभीरची 'हनुमान चालिसा'; नेमकं काय प्रकरण

The Buckingham Murders : रणवीर ब्रारला कानाखाली मारण्यासाठी करिनाने वापरले 15 टेक, "ती मला हातच लावत नव्हती"

SCROLL FOR NEXT