हुकूम मुलाणी-
Ram Satpute: विरोधकांनी जिल्ह्यात आयटी पार्क केले नसल्यामुळे त्यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही. पण मुख्यमंत्री असताना सोलापुरातील 12 अतिरेक्यांना सोडण्याचे काम केल्याचा खळबळ जनक आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला आहे. राम सातपुते यांनी सुशिलकुमार शिंदे यांच्यावर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
विरोधकांनी जिल्ह्यात आयटी पार्क केले नसल्यामुळे त्यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही. पण मुख्यमंत्री असताना सोलापुरातील 12 अतिरेक्यांना सोडण्याचे काम केल्याचा खळबळ जनक आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला आहे. राम सातपुते यांनी सुशिलकुमार शिंदे यांच्यावर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
भारतीय जनता पार्टी व महायुती यांच्यातर्फे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांनी समाधान आवताडे यांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे सदिच्छा भेट दिली असता उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना सातपुते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडामध्ये देशाच्या व राज्याच्या महत्वपूर्ण आणि सर्वोच्च पदावर सत्तेची फळे चाखणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसवाल्यांनी केवळ खुर्चीला चिकटून राहण्यामध्येच धन्यता मानली, अशा मंडळींना आपणा सर्वांच्या आशीर्वादावर व पाठिंब्यावर आपण जोरदार टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.
विकासाच्या बाबींपेक्षा घराणेशाहीचा वारसा असणाऱ्या एका राजकन्येला लोकशाहीची आणि जनतेची ताकद दाखवून देण्यासाठी संघर्षाच्या खाईतून निर्माण झालेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. मला सेवेसाठी पाठवल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीच्या रूपाने आपल्या सेवेची संधी द्या मग खासदार म्हणजे काय हे आपणास दाखवून देतो अशी ग्वाही सातपुते यांनी दिली.
आमदार समाधान आवताडे म्हणाले. दहा वर्षात मोठ्या विकासनिधी आणून कामे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास मोठ्या प्रमाणात केली. जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण म्हणाले की, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची कोणतेही देणेघेणे नसलेल्या उमेदवाराने आमदार राम सातपुते यांचे तिकीट जाहीर झाल्यानंतरच बोलण्यातून आपली हतबलता स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.