Solapur Lok Sabha Poll  Sakal
सोलापूर

Solapur Lok Sabha Poll : पवारांच्या विरोधात लढत झाल्यास नशीबच - रणजितसिंह नाईक-निंबाळकर

खासदार निंबाळकर म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघात आतापर्यंत झाली नव्हती, एवढी विकासकामे गेल्या पाच वर्षात झाली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हणून शरद पवारांची ओळख आहे. माझे जेवढे वय आहे, तेवढा त्यांचा राजकारणातील अनुभव आहे. माढ्यातून शरद पवार यांनीच मैदानात यावे, असे आव्हान मी यापूर्वीच दिले आहे.

माढ्यातून महाविकास आघाडीतर्फे शरद पवार मैदानात उतरले तर माढ्याची लढत देशपातळीवर चर्चेची लढत होईल. पवारांच्या विरोधात लढायला मिळाल्यास माझे नशीबच, अशी माहिती माढ्याचे खासदार तथा भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर खासदार निंबाळकर यांनी ‘सकाळ’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. खासदार निंबाळकर म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघात आतापर्यंत झाली नव्हती, एवढी विकासकामे गेल्या पाच वर्षात झाली आहेत.

मतदार संघातील एमआयडीसी आणि सिंचनाचा प्रश्‍न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. या मतदार संघात केलेल्या कामांच्या जीवावरच मी पवारांना माढ्यातून लढण्याचे आव्हान दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार निंबाळकर म्हणाले, धैर्यशील मोहिते-पाटील हे भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्याने ते व त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. मोहिते-पाटील यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक प्रकरणात मदत केली आहे.

विधान परिषद दिली आहे. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांची साथ सोडतील, असे वाटत नाही. भाजपने दिलेला आदेश ते नक्कीच पाळतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

जागा बदलाचा खोडसाळपणा

माढ्याची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार असल्याचा मेसेज काहीजण व्हायरल करत आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही. माढ्याची जागा ही भाजपच लढणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वात अगोदर माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे.

पक्षाने केलेल्या सर्व्हेत मला मिळालेली पसंती ही सर्वाधिक असल्याने राज्यातील भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत आपला समावेश झाला असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT