babanrao shinde Sakal
सोलापूर

Babanrao Shinde : आमदार शिंदे सोडणार पवारांची साथ? रणजितसिंह शिंदे यांना माढ्यातून अपक्ष उतरविण्याचा निर्णय

Babanrao Shinde : जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा आमदार शिंदे यांनी निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.‌ अजित पवार गटाचे अनेक नेते आणि आमदार शरद पवार गटाकडे जात असतानाच आज माढ्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अजित पवार आणि महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा आमदार शिंदे यांनी निर्णय घेतला आहे.

आमदार बबनराव शिंदे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. आमदार शिंदे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीनंतर आमदार बबनराव शिंदे यांना मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर त्यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेऊन उमेदवाराची मागणी केली होती. परंतु, माढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिंदे यांना उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. वाढता विरोध पाहता आमदार शिंदे यांनी मुलाला अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार शिंदे म्हणाले, शरद पवार यांची दोन वेळा भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी अद्याप कोणालाच उमेदवारीचा शब्द दिला नाही. शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही तर माझा मुलगा रणजितसिंह हा माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. यातून आमदार शिंदे यांनी शरद पवार यांनाही सूचक इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आमदार शिंदे यांच्या भूमिकेनंतर माढ्याचा महायुतीचा उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.

अभिजित पाटील रोहित पवारांच्या भेटीला

माढा विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताच विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज दुपारी आमदार रोहित पवारांची भेट घेतली. पवार-पाटील भेटीने माढ्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भेटीदरम्यान कोणती राजकीय चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

अभिजित पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला होता. लोकसभेत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विठ्ठल कारखान्याला ३४८ कोटींचे एनसीडीसीचे कर्ज देण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत केली. माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. शरद पवार कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार याकडेच लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT