Ad. rahul ghule sakal
सोलापूर

Mangalwedha News : रविकांत तुपकरांची हकालपट्टी, पडसाद मंगळवेढ्यात

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेत संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची संघटनेतून हकालपट्टी केल्यामुळे मंगळवेढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रिडालोस मधून विशेषता स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानीच्या चिन्हावर स्व. आ. भारत भालके हे आमदार झाले. त्यानंतर या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल विशेषता राजू शेट्टी व सदाभाऊ खोत बद्दल चांगली क्रेझ निर्माण झाली. मात्र 2014 नंतर सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाला.

तरी देखील मंगळवेढ्यात राजू शेट्टी बद्दल सहानुभूती दाखवत या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम पुढे चालू ठेवले. या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये पिक विमा, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रश्न, उजनी कालव्याचे पाणी नंदुर, बोराळे भागात देणे, म्हैसाळचे पाणी, ऊस दर,पिक कर्ज, या शेतकरी प्रश्नावर सातत्याने आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका पार पडल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना या संघटनेच्या कामाबद्दल आस्था होती.

मात्र, तुपकर यांच्या हकालपट्टीमुळे या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. राहुल घुले हे देखील तुपकर यांचे नेतृत्व स्वीकारणार असून त्यांच्यासोबत या तालुक्यातील काही पदाधिकारी तुपकर यांच्या गटात सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठे खिंडार पडणार आहे.

सध्या तिसरी आघाडी तयार करून विधानसभेला सामोरे जाण्याचे संकेत आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी सध्या नवनवीन नावे चर्चेत येऊ लागली आहे त्यामध्ये तुपकर यांची संघटना देखील उतरू शकते.

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी निर्माण करण्यासंदर्भात उद्या पुणे येथे बैठक आहे. मी त्या बैठकीला पदाधिकारी सोबत घेऊन जाणार आहे. माझ्यासोबत मंगळवेढ्यातील सर्व पदाधिकारी असणार आहेत. पंढरपूर विधानसभेची जागा देखील ही संघटना लढवणार असून मी त्या जागेचा उमेदवार आहे.

- अॅड. राहुल घुले, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT