Solapur News  sakal
सोलापूर

Solapur News : गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयाची घट ; राज्यातील प्रमुख खासगी संघांच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल

राज्यातील प्रमुख खासगी संघांनी गाईच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये एक रुपयांची कपात केली आहे. एकच महिन्यापूर्वी खासगी संघांनी दुधाच्या खरेदी दरात सुधारणा केली होती. दर सुधारणेमुळे उत्पादकांना आशा निर्माण झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

उ. सोलापूर : राज्यातील प्रमुख खासगी संघांनी गाईच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये एक रुपयांची कपात केली आहे. एकच महिन्यापूर्वी खासगी संघांनी दुधाच्या खरेदी दरात सुधारणा केली होती. दर सुधारणेमुळे उत्पादकांना आशा निर्माण झाली होती. मात्र या नवीन निर्णयामुळे दूध उत्पादक हताश झाले आहेत.

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांना आणखीन एक धक्का बसला आहे. महिन्याच्या सुरवातीला राज्यातील खासगी संघांनी गाईच्या दुधाच्या एक रुपयाची वाढ केली होती. मात्र अवघ्या पंधरा दिवसात ही वाढ मागे घेण्यात आली आहे. २८ रुपये प्रतिलिटरवरून परत एकदा २७ रुपये प्रतिलिटर इतका दर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात गाईच्या दुधाचे दर घसरण्यास सुरवात झाली.

यावर्षी ते दर प्रतिलिटर अवघे २६ रुपयांपर्यंत येऊन थांबले होते. याबाबत दूध उत्पादकांनी आक्रोश व्यक्त केल्यानंतर सरकारने ५० दिवसांसाठी अनुदानाचा टेकू दिला. मात्र यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. यावर्षी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून विक्रमी तापमानामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. असे असतानाही दुधाच्या दारात सुधारणा झाली. या महिन्याच्या सुरवातीला राज्यातील खासगी व सहकारी संस्थांनी गायीच्या दुधाच्या खरेदीत प्रतिलिटर एक रुपयांची वाढ केली.

या वाढीमुळे काही संस्थांचे दर प्रतिलिटर २७ वरून २८ तर काही संस्थांचे २६ वरून २७ झाले. पशुखाद्याचे गगनाला भिडलेले भाव, महागलेली पशुवैद्यकीय सेवा यामुळे गायीच्या दुधाच्या उत्पादनाचे गणित संपूर्णपणे कोलमडून गेले आहे. एक रुपया भाव वाढ झाल्यानंतर दुधाच्या दरात आणखीन सुधारणा होण्याची अशा निर्माण झाली होती. मात्र राज्यातील खासगी संघांनी घेतलेल्या नवीन निर्णयामुळे ही अशा सपशेल फोल ठरली आहे.

गेल्या पाच वर्षात कोरोना नंतरच्या एक वर्षाचा अपवाद वगळता दूध व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. पदर मोड करत शेतकरी गोठ्यातील जनावरे जगवण्यासाठी धडपड करत आहे. राज्यात दुधातील सहकार क्षीण झाला असून खासगी संघाची बलिष्ठ साखळी तयार झाली आहे. ही साखळी फक्त नफा कमावणे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्यातील दूध उत्पादकांची आर्थिक पिळवणूक करत आहे. या कंपूतील काही बोके सरकार व विरोधी पक्षात असल्यामुळे ही लूट सुरू आहे. आक्रोश व्यक्त करण्यापलीकडे राज्यातील दूध उत्पादकांसमोर पर्याय उरला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भुकटी व लोण्याचे दर पडले आहेत. त्याचबरोबर दक्षिण भारतात पाऊस सुरू झाल्यापासून दुधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळे त्या भागातील मागणी घटली आहे. जोपर्यंत सरकार निर्यातीच्या बाबतीत खंबीर पावले उचलत नाही, तोपर्यंत दुधाची दराची परिस्थिती सुधारणे अशक्य आहे.

— दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई, इंदापूर, जि. पुणे

अक्षरशः पाणी बाटलीच्या दरात सध्या गाईच्या दुधाची खरेदी केली जात आहे. सरकारने अवघ्या दीड महिन्यासाठी अनुदान योजना राबवली. सरकारचे दूध धंद्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे. अशा स्थितीत आम्ही आमची जनावरे जगवायची कशी? आज जनावरे संपली तर उद्या शेती धोक्यात येईल.

— प्रवीण आदमाने, दूध उत्पादक शेतकरी, बीबी दारफळ, ता. उत्तर सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT