सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरू लागली असून शहरात सहा तर ग्रामीणमधील ९६ रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी (ता. २३) ग्रामीणमध्ये एक हजार २३ संशयितांमध्ये पाच तर शहरातील ५९७ संशयितांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.शहरातील प्रभाग पाच, सहा, १५ व २६ मध्ये एकूण सहा रुग्ण ॲक्टिव्ह असून उर्वरित २२ प्रभाग कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामीणमधील अक्कलकोट व दक्षिण सोलापूर हे दोन्ही तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामीणमध्ये गुरुवारी अक्कलकोट, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, सांगोला व दक्षिण सोलापूर या तालुक्यांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही.(Relieve the city from Corona again)
तर करमाळा, उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. तर बार्शी तालुक्यात दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण वाढल्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. अजूनही शहरातील एक लाखांहून अधिक तर ग्रामीणमधील पाच लाखांवर व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लस न टोचणाऱ्यांवरील निर्बंध कडक केले, परंतु त्याला अनेकांनी विरोध केल्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
डिसेंबरमध्ये कमी झाला कोरोना
१ ते २३ डिसेंबर या काळात शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला. तर ग्रामीणमध्येही दिलासादायक स्थिती आहे. डिसेंबर महिन्यात शहरात अवघे २३ नवीन रुग्ण आढळले असून चार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे ग्रामीणमध्ये या महिन्यात २३१ रुग्ण वाढले आहेत. तर ग्रामीणमधील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेतील ही सर्वात दिलासादायक स्थिती आहे.(the most comforting condition in both waves of the corona)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.