कोरोना मृतांच्या वारसांचे अर्ज 'रिजेक्‍ट'! 'ही' आहेत कारणे esakal
सोलापूर

कोरोना मृतांच्या वारसांचे अर्ज 'रिजेक्‍ट'! 'ही' आहेत कारणे

कोरोना मृतांच्या वारसांचे अर्ज 'रिजेक्‍ट'! 'ही' आहेत कारणे

तात्या लांडगे

चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्याने शहरातील जवळपास एक हजार 700 तर ग्रामीणमधील एक हजार अर्ज अपात्र ठरले आहेत.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजारांची मदत मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास प्रारंभ झाला आहे. परंतु, चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्याने शहरातील जवळपास एक हजार 700 तर ग्रामीणमधील एक हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. तीन हजार अर्जांपैकी केवळ दहा अर्ज पात्र ठरल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (District Disaster Management Authority) दिली. (Requests for help from the heirs of the person who passed away due to corona have been rejected-ssd73)

जिल्ह्यातील पाच हजार 127 रुग्णांचा कोरोनाच्या दोन्ही लाटेत मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसांनी http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावरून मदतीसाठी अर्ज केले आहेत. अर्ज सबमिट केल्यानंतर शहरातील अर्ज महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे (Health Department) तर ग्रामीणमधील अर्ज जिल्हा शल्यचिकित्सक (District Surgeon) कार्यालयातून पडताळले जातात. त्या ठिकाणी मृत रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) होता का, त्याच्या मृत्यूचे कारण कोरोनाच आहे का, या बाबींची पडताळणी केली जाते. त्या ठिकाणी अनेक अर्ज अपात्र ठरू लागले आहेत.

महापालिकेचे आरोग्याधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडून अर्ज पात्र झाल्यानंतर पुन्हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे ते पाठविले जातात. त्यानुसार महापालिकेने दहा तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी 25 अर्ज प्राधिकरणाकडे पाठविले आहेत. मात्र, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अंतिम स्वरूपात पात्र अर्जांची पडताळणी करताना 35 पैकी केवळ दहा अर्ज पात्र ठरले आहेत. अपात्र अर्जदारांना त्रुटी दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज करावे लागणार आहेत. अर्जासोबत कॅन्सल चेक (धनादेश) अथवा त्याचा फोटो किंवा अचूक बॅंक (Bank) खाते क्रमांक अपलोड करावा लागणार आहे, जेणेकरून बॅंक खात्याची खात्री होईल, असा हेतू आहे.

आकडे बोलतात...

  • शहरातून अपेक्षित अर्ज : 1459

  • प्राप्त अर्ज : 2379

  • मंजूर अर्ज : 10

  • ग्रामीणमधून अपेक्षित अर्ज : 3668

  • प्राप्त अर्ज : 1074

  • मंजूर अर्ज : 25

अर्ज इंग्रजीतून असल्याने अडचणी

बोटावर मोजण्या इतपत शिक्षण घेतलेल्या कुटुंबातील वारसांना ऑनलाइन अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या ओळखीतील व्यक्‍तीकडून जमेल तसे अर्ज भरले जात आहेत. संपूर्ण अर्ज इंग्रजीमधून (English) भरावा लागत असल्याने चुकीच्या पद्धतीने माहिती भरली जात आहे. अनेक अर्जदारांनी नाव लिहिण्याच्या जागेवर कोविड-19 असे नाव टाकले आहेत, तर काहींनी रुग्ण म्हणून स्वत:चे नाव टाकले आणि मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate) त्या व्यक्‍तींचे अपलोड केले आहे. त्यामुळे अर्ज मराठीतूनही (Marathi) असावा, अशी मागणी केली जात आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांकडून मदतीसाठी ऑनलाइन अर्ज केले जात आहेत. परंतु, त्यात प्रचंड त्रुटी असल्याने बहुतेक अर्ज अपात्र ठरत असल्याने त्यांनी अचूक अर्ज भरावेत.

- डॉ. प्रदीप ढेले (Dr. Pradeep Dhele), जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT