सोलापूर : लसीकरण मोहिमेअंतर्गत दुर्गम भागात लस पोहचविण्यासाठी आईस-बॉक्सचा वापर केला जातो. मात्र, वेळेत लस न पोहचल्याने बहूतांशवेळा लस खराब होते. त्यामुळे अनेक बालके व महिला लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आईस पॅकऐवजी पेल्टीअर मॉड्यूल अर्धसंवाहकाद्वारे रेफ्रीजरेटरविना पोर्टेबल शितक तयार केला आहे. त्यामुळे दुर्गम भागात दर्जेदार लस पोहचवणे सहज शक्य होणार आहे.
पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करुन यासिन दखनी व शुभम राऊल या विद्यार्थ्यांनी पोर्टेबल शितक तयार केला आहे. सोलारद्वारे या बॉक्समधील तापमान 2.8 सेल्सिअंशपर्यंत साध्य करता येते. तत्पूर्वी, सध्या वापरण्यात येणाऱ्या आईस बॉक्सचे तापमान साध्य करण्यासाठी वीजेचा वापर करावा लागतो. त्याची साठवण क्षमताही दिड लिटरपर्यंतच आहे. वीज नसल्यास त्या बॉक्समधील लस खराब होत असल्याचा अनुभव अनेकदा आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना आला आहे. काहीवेळा खराब लस दिल्याने रुग्णांना धोकाही निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी सुरु केलेल्या 'अविष्कार' आंतरविद्यापीठीय राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेत या प्रकल्पास नुकताच द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा - शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत 'हा' आहे खोडा
ठळक वैशिष्टे...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.