Petrol_Gas Canva
सोलापूर

कामे बंद अन्‌ त्यात महागाईच्या असह्य झळा ! इंधन, खाद्यतेलांच्या दरांचा बाजारपेठेत कहर

इंधन व खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोसळले आहे

वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : कोरोना विषाणूचे (Corona Virus) संकट आल्यापासून महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे (Inflation is rising day by day). कारण वर्षभरात पेट्रोल (Petrol) लिटरला सरासरी 21 तर खाद्यतेल (Edible oil) 50 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर गॅस सिलिंडर (Gas cylinder), बांधकाम साहित्य (Construction materials) दराची घोडदौड सुरूच आहे. कोरोनामुळे एकीकडे रोजगार कमी झाला, हातावर पोट असणाऱ्यांचे व्यवसाय बंद पडले, पण दुसरीकडे मात्र महागाईने पाय पसरल्याचे दिसून येत आहे. (Rising fuel and edible oil prices have plunged the general budget)

सद्य:स्थितीत कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाउन (Lockdown) सुरू आहे. यामुळे व्यवसायांवर परिणाम झाला, सामान्यांची कामं बंद पडली, छोट्या विक्रेत्यांना तर दुकानांना टाळं लावावं लागलं. त्यातच इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. यामुळे महागाई आगीत तेल ओतण्याचेच काम करत आहे. त्याचबरोबर कोरोना संकटाचा आयात- निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळे पाश्‍चात्य देशांनी कर वाढविल्याने खाद्य तेलालाही माहागाईची फोडणी बसली आहे.

जिल्ह्यात पेट्रोलला 101 रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर गतवर्षी डिझेलला लिटरला 66.90 दर होता. आता 90 रुपये लिटरवर पोचले आहे. यावरून अवघ्या वर्षभरात पेट्रोल 22 तर डिझेलमागे सरसरी 23 रुपयांची वाढ झाली आहे. या इंधनवाढीवरही महागाईचं गणित बहुतांशी अवलंबून आहे. कारण, आज यंत्राच्या सहाय्याने शेतीची कामे करायची झाली तर एकरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर शेतमाल बाजारपेठेत घेऊन जायचं झालं तरी भाड्यात वाढ झाली आहे.

खाद्यतेलामुळे तर महागाईला कडकच फोडणी मिळाली. कारण, देशात 70 टक्‍के तेल आयात होते. पाश्‍चात्य देशांनी अर्थव्यवस्था सुधरण्यासाठी निर्यात कर वाढवला आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. कोरोनामुळे कामं बंद पडत आहेत. सामान्यांना घरात बसून दिवस ढकलावे लागत आहेत. पोलिसांच्या भीतीने हातगाडीधारक गल्लीबोळात जाऊन साहित्य विक्री करत जगण्यासाठी धडपड करत आहेत. अशा काळात महागाई हातपाय अधिकच पसरू लागली आहे.

सामान्यांचा किचनशी फार मोठा संबंध

किचनशी संबंधित गोष्टी आटोक्‍यात आल्या तर सामान्यांना अच्छे दिन असतात. यामध्ये गॅस सिलिंडर महत्त्वपूर्ण ठरते. पण गेल्या वर्षभराचा विचार करता सिलिंडरचा दर जवळपास 225 रुपयांनी वाढला आहे. यामध्ये फक्‍त एकदाच तेही दीड महिन्यापूर्वी 10 रुपये कमी होते.

इंधन दर रुपयांत (मार्च 2020 ते मे 2021)

  • पेट्रोल : 77.95 - 101

  • डिझेल : 66.84 - 90

खाद्यतेल प्रतिकिलो दर (मार्च 2020 ते मे 2021)

  • सोयाबीन : 90 - 145

  • सूर्यफूल : 100 - 180

  • शेंगदाणा : 140 - 180

  • पामतेल : 80 - 130

भारतात गेल्या सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ होत आहे. याला कारण म्हणजे देशात 70 टक्‍के खाद्यतेल आयात होते. पाश्‍चात्य देशांनी कोरानामुळे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्यात कर वाढविला आहे. त्यामुळे आपल्याकडे महागाई दिसून येत आहे. यापुढे खाद्यतेलाचे भाव तेजीतच राहणार आहेत.

- पवन परदेशी, खाद्यतेल विक्रेते, चौपाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

SCROLL FOR NEXT