sale of dangerous e-cigarettes in Solapur diseases ban on import and export along with production Sakal
सोलापूर

Solapur : घातक ई-सिगारेटची सोलापुरात छुपी विक्री; अनेक आजारांना निमंत्रण, उत्पादनासह आयात-निर्यातीवरही बंदी

सामान्य तंबाखूपासून बनणाऱ्या सिगारेटसारखाच धूर सोडणारी, पण वास नसणारी, आकर्षक चवीची पण महागड्या अशा ई-सिगारेटवर बंदी आहे.

सकाळ वृत्तसेवा

- रामेश्वर विभूते

सोलापूर : सामान्य तंबाखूपासून बनणाऱ्या सिगारेटसारखाच धूर सोडणारी, पण वास नसणारी, आकर्षक चवीची पण महागड्या अशा ई-सिगारेटवर बंदी आहे. शिवाय शरीराला ती घातक असली तरी आणि नियमबाह्य असली तरी सोलापुरातील काही दुकानांमध्ये याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे.

पेन-ड्राइव्ह सारखे दिसणारे हे उपकरण असते. जे धूम्रपानासाठी सोयीस्कर आणि वास-मुक्त पर्याय म्हणून लोकप्रिय आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स (उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, संचयन आणि जाहिरात) कायदा, २०१९ द्वारे भारतात ई-सिगारेट्सवर बंदी घालण्यात आली आहे.

द्रव्य गरम करून हुक्का ओढल्याप्रमाणे सामान्य तर बॅटरीवर चालणाऱ्या यंत्राव्दारे छोट्या आकारात असणारी अशी ही ई-सिगारेट असते. या द्रवामध्ये निकोटीन, फ्लेवरिंग एजंट आणि कूलिंग एजंट्ससह अनेक पदार्थ असतात. त्यात निकेल, कथील आणि शिसे यासारख्या जड धातूंचाही समावेश आहे. याला व्हॅपिंग असेही म्हणतात.

अशी असते ई-सिगारेट?

  • ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नाही. त्यातून राख तयार होत नाही आणि दातांवर डाग पडत नाहीत.

  • ई-सिगारेटच्या टोकाला एलइडी लाईट असतो. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होते.

  • ई-सिगारेटमध्ये बॅटऱ्यांचा समावेश असतो.

  • खऱ्या सिगारेटसारखा धूर येत असल्याने सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी लोकांना ई-सिगारेटचा पर्याय असतो.

  • कॅनडा आणि इंग्लंडने ई-सिगारेटवर बंदी घातली आहे.

विशेष कल तरुणाईचा

ई-सिगारेटचा आकार एखाद्या पेन ड्राइव्ह किंवा परफ्युम बाटलीप्रमाणे असतो. ई-सिगारेट डिझाईनच्या दृष्टीने अतिशय आकर्षक आहेत. त्याच्यात द्रव्य रूपातील निकोटीन तसेच चव येण्यासाठी मोहक चवीमध्ये चॉकलेट, हेझलनट, पेपरमिंट, गमी बेअर्स, क्रीम ब्रुली, आंबा, कॅनबेरी, पायनापल, रोज असे वेगवेगळे फ्लेवर असतात.

यांचा वापर करताना पारंपारिक धूम्रपानासारखा दुर्गंध येत नाही. काही जण अधिकची नशा व्हावी यासाठी यात कोकेन, चरस किंवा तत्सम नशा येणारे वस्तू टाकतात. काहींना यात गांजाचे पाणी टाकून पिण्याचीही सवय असते. सहसा अनोळखी व्यक्तीस ही दिली जात नाही. केवळ ‘कॉन्टॅक्ट’ मध्ये असणाऱ्यांनाच याचा लाभ होतो. महागडी असल्याने याचा वापर करणारा वर्गही वेगळा आहे.

ऑनलाइनही मागवतात

ही सिगरेट किंवा हुक्का ऑनलाइनही मागवता येतो. पूर्वीच्याकाळात वापरण्यात येणाऱ्या लाकडी हुक्क्याला आता काचेच्या भांड्याचे रूप देण्यात आले आहे. अवघ्या हजार रुपयांपासून हे उपलब्ध असतात.

त्याच्या पाईपची लांबी, हे द्रव्य ठेवायचे काचेचे पात्र आणि आकर्षकपणा शिवाय एका व्यक्तीला पिता येणारा किंवा चारही जण एकत्र पितील अशी सोय असणारा यावर याच्या किंमती अवलंबून असतात. याला सिंगल होस पाईप, फोर पाईप अशी नावे असतात. कोणत्याही वस्तू मागवण्याच्या ॲपवरून याची ऑर्डर देता येते. तर बॅटरीची क्षमता, फ्लेवर आणि आकारमान यावर ई-सिगारेटच्या किमती आहेत. ज्या ३ हजारांपासून सुरू होतात.

ही सिगारेट शहरात पोचवण्यासाठी कोणी वितरक काम करत आहे का? हे आधी पहावे लागेल. तसेच शहरातील कोणत्या पान टपरीवर किंवा दुकानांमध्ये हा माल विकला जातो याचीही तपासणी करावी लागेल. प्रशासन त्यासाठी सज्ज असून सखोल तपास करीत कारवाई करू.

- एम. राजकुमार, पोलिस आयुक्त

व्हॅपिंगमुळे पल्मोनरी फायब्रोसिस, ब्राँकायटिस आणि फुफ्फुसात इजा होऊ शकते. छाती आणि श्वासनलिका संसर्गासह या सर्वांमुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो. ई-सिगारेटमधील निकोटीनमुळे हृदय गती आणि रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. वारंवार वापर आणि निकोटीन सामग्रीने वाफ काढणे हे एक व्यसन बनू शकते ज्याचा सामना करणे कठीण आहे.

- डॉ. जीवन पैकेकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT