Raju Shetty eSakal
सोलापूर

Sangali : द्राक्ष बागायतदारांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे ;राजू शेट्टी

मिरज, तासगाव, कवठेमहांकाळला नुकसानग्रस्त बागांची पाहणी

सकाळ डिजिटल टीम

सांगली : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांचे शंभर टक्के कर्ज माफ करा. द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. त्यांनी आज जिल्ह्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केली. त्यांच्यासमवे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कोल्हापूरचे नेते सावकर मादनाईक होते.

मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ भागातील द्राक्षबागांची पाहणी केल्यानंतर शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी या संकटात संपूर्ण आधार मिळायला हवा, अशी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची कर्जे माफ करायला हवीत. तसेच द्राक्ष पीक विमा योजना शेतकरी हिताची नसून केवळ कंपनी हिताची आहे. त्यामुळे ती बदलायला हवी.

राज्य सरकारने मदतीचा हात न दिल्यास रस्त्यावर उतरून न्याय देऊ.’’

या वेळी पोपट मोरे, संजय बेले, संजय खोलखुंबे, भरत चौगुले, नंदू नलवडे, श्रीधर उदगावे, बाळासाहेब सुरेश वसगडे, सुहास केरीमाने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. कोंगनोळी येथील सागर वावरे शेतकऱ्याने द्राक्षबागेचे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT