सोलापूर

महूद-पंढरपूर रोडवर पकडला 63.61 लाखांचा गांजा

उमेश महाजन

पंढरपूर-महूद रस्त्यावरून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली होती.

महूद (सोलापूर) : पिकअप मधून घेऊन चाललेला 11 पोत्यामधील 318 किलोग्रॅम वजनाचा सुमारे 63 लाख 61 हजार 900 रुपये किंमतीचा गांजा सांगोला पोलिसांनी महूद-पंढरपूर रोडवर (pandharpur-mahud road) रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पकडला आहे. (sangola police have seized cannabis on the pandharpur-mahud road on monday night)

पंढरपूर-महूद रस्त्यावरून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोल्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांचेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.एन.यमगर, ए.एस.नाळे, आय.श्री.ढवणे, पोलिस हेडकॉन्स्टेबल आप्पासाहेब पवार, पोलिस नाईक अभिजीत मोहोळकर, पोलिस कॉन्स्टेबल श्री.पाटील, श्री.चोरमले, यांनी सांगोला पोलिस स्टेशनच्या हद्दीत महूद ते पंढरपूर रस्त्यावर हॉटेल जय तुळजाभवानी (गायगव्हाण ता.सांगोला) हद्दीत सापळा लावला होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती. लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर रहदारी कमी होती. अशावेळी गांजाची वाहतूक करणारे वाहन न थांबल्यास त्याचा पाठलाग करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली होती. रविवारी रात्री उशिरा पांढऱ्या रंगाचे पिकअप भरधाव वेगाने पंढरपूर वरुन महूद कडे येताना दिसले. पहिल्या पोलिसांच्या पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केल्याने हे वाहन दुसरे पथक असलेल्या हॉटेल जय तुळजाभवानीच्या समोर येऊन थांबले.

पिकअप क्रमांक एम. एच. 12, जे.एफ.14 44 च्या वाहनचालकास पिकअप मध्ये काय आहे विचारले असता त्याने मोकळे कॅरेट असल्याचे सांगितले. त्यावेळेस उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता वरच्या बाजूला 83 मोकळे कॅरेट ठेवून त्याखाली निळ्या रंगाच्या ताडपत्री खाली पांढऱ्या रंगाची अकरा पोती गच्च भरून गांजा ठेवलेला दिसून आला. अकरा पोत्यांमध्ये हिरवट रंगाचा बियासह असलेला 318.095 किलो ग्रॅम वजनाचा 63 लाख 61 हजार 900 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. पंचा समक्ष या मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला आहे.

वाहनचालक कुमार पांडुरंग जाधव (रा.महूद ता. सांगोला) यास वाहन व मुद्देमालासह ताब्यात घेतले असून वाहन मालक सोमनाथ सुरेश कांबळे (रा.महूद ता. सांगोला) याच्या मालकीचा हा संपूर्ण गांजा असल्याचे कुमार जाधव याने सांगितले. पोलिस निरीक्षक सुहास जगताप या प्रकरणाचा तपास करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महूद परिसरात गांजा या अमली पदार्थाची वाहतूक व विक्री होत असल्याचे समजल्याने खळबळ उडाली आहे. (sangola police have seized cannabis on the pandharpur-mahud road on monday night)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT