Sangola Vidhan Sabha Election 2024  sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : मत विभाजनाच्या फायद्या-तोट्यावरच विजयाचे गणित

Sangola Vidhan Sabha Election 2024 : मागील निवडणुकीतील दोस्तांची कुस्ती; पक्षांच्या प्रचारापेक्षा गटातटावरच भिस्त

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला तालुक्यात प्रथमच अतिशय रंगतदार तिरंगी लढत लागली आहे. आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील तर शेतकरी कामगार पक्षाने डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

एकीकडे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा असले तरी दुसरीकडे शेकापसाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील प्रचार करीत आहेत. त्यामुळे येथे महायुती किंवा महाविकास आघाडी असा दोन राज्यस्तरीय सामना नसून येथे उमेदवाराच्या पक्षांपेक्षा गटामध्येच सामना रंगला आहे. विधानसभेसाठी नेहमी दुसऱ्यांना पाठिंबा देणारे दीपकआबा यावेळी मी समोरच्या दोन्ही उमेदवारांना, त्यांच्या पक्षाला या अगोदर साथ दिल्याने त्यांनी मला एक वेळ मला संधी द्यावी, असे सांगत विधानसभेच्या मैदानात उतरले. त्यांच्या मतांच्या गोळाबेरीजेवर येथील विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

मतविभागणीचा फायदा नेमका कोणाला

या आधीच्या निवडणुकांमध्ये उमेदवार जरी जास्त असले तरी सामना हा दुरंगीच लढला जात होता. माजी आमदार साळुंखे-पाटील दोन्हीपैकी कोणत्यातरी एका पक्षाला पाठिंबा देत असल्यामुळे येथे दुरंगी लढती पाहिल्या आहेत. परंतु यावेळी साळुंखे-पाटील प्रथमच मैदानात असल्याने तिरंगी लढतीचा नेमका फायदा-तोटा कोणाला होणार, याकडे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

दीपकआबांचा नवीन राजकीय बॉम्ब विजयापर्यंत कसा पोहचू शकतात याचा आराखडाच त्या गटातील अनेकजण मांडत आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीत नेमका कोणाला फायदा होईल याची चर्चा तालुक्यात जोर धरत आहे. कोण कोणाची मते कापणार आणि जातीय समीकरणांची मोट कशी बांधणार यावर विजयाचे सूत्र आहे.

यंदाचे प्रमुख उमेदवार (२०२४)

  • एकूण उमेदवारांची संख्या १३

  • एकूण मतदार संख्या ३ लाख ३३ हजार ४९३

    उमेदवार

  • दीपकआबा साळुंखे पाटील - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • शहाजीबापू पाटील - शिवसेना

  • डॉ. बाबासाहेब देशमुख - शेतकरी कामगार पक्ष

दोन निवडणुकांमधील मतदान २०१४

  • एकूण मतदार संख्या २ लाख ७१ हजार ३७६

  • झालेले मतदान एक लाख ९८ हजार १९७

  • उमेदवार मिळालेली मते

  • स्व. गणपतराव देशमुख ९४ हजार ३७४ (शेकाप)

  • शहाजीबापू पाटील ६९ हजार १५० (शिवसेना)

  • श्रीकांत देशमुख १४ हजार ०७४ (भाजप)

  • शेकापचे स्व. गणपतराव देशमुख हे २५ हजार २२४ मतांनी विजयी.

२०१९

  1. एकूण मतदार संख्या २ लाख ९३ हजार ९६९

  2. झालेले मतदान २ लाख १५ हजार ४६८

  3. उमेदवार मिळालेली मते

  4. शहाजीबापू पाटील ९९ हजार ४६४ (शिवसेना)

  5. डॉ.अनिकेत देशमुख ९८ हजार ६९६ (शेकाप)

  6. राजश्री नागणे पाटील ४ हजार ४८४ (अपक्ष)

  7. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील ७६८ मतांनी विजयी

    #ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT