solpur  sakal
सोलापूर

Solapur News : संक्रांतीच्या सणावर महागाईचे सावट ; तीळ, गूळ, हरभरा, कणीस, रेवडी अन्‌ हळदी-कुंकू साहित्याच्या दरात वाढ

आपुलकी वाढविण्यासाठी मकर संक्रांतीचे महत्त्व आहे. मात्र, महागाईचे लोण आता संक्रांती सणावरही पडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पारेवाडी : नवीन वर्षाची सुरवात सर्वात मोठ्या मकर संक्रांती या सणाने होते. एकमेकांना तिळगूळ देऊन ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत परस्परांतील प्रेम, स्नेह, आपुलकी वाढविण्यासाठी मकर संक्रांतीचे महत्त्व आहे. मात्र, महागाईचे लोण आता संक्रांती सणावरही पडले आहे.

तिळाबरोबरच गुळाचे दरही वाढल्याने संक्रांती सणावरच संक्रांत आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केत्तूरच्या आठवडे बाजारात वाण खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. केत्तूर परिसरातील दहा-बारा खेड्यांचा संपर्क असल्याने व येथे बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. मकर संक्रांती हा सण गोडवा देणारा व आपसांतील गोडवा वाढवणारा सण आहे. मात्र, बाजारात तिळाबरोबरच गुळाचे दरही वाढले आहेत. सध्या बाजारात संक्रांतीला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लगत आहे.

खरेदीसाठी शेतकरी व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आठवडा बाजारही मोठ्या प्रमाणावर भरला होता.गर्दीने फुलून गेला होता त्यामुळे विक्रेते मात्र खुशीत होते. घरोघरी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम ठेवून वाणासोबत तिळगूळ देण्याची परंपरा आहे. पाण्याची टंचाई बघता बाजारात संक्रांतीला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती आम्हालाच खूप महागाने खरेदी कराव्या लागल्याने पुढे बाजारात चढ्या भावाने विक्री करावी लागते असल्याचे विक्रेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. कमी पावसामुळे ज्वारीबरोबरच हरभरा पिकाचे क्षेत्र कमी असल्याने हरभऱ्याची एक पेंढी १० ते १५ रुपयांना तर हुरडा झालेल्या ज्वारीचे एक कणीस १० रुपये नग, संक्रांतीसाठी लागणारी गावरान बोरे मात्र आठवडा बाजारात अत्यंत कमी प्रमाणात विक्रीसाठी आली होती.

महिलांची खरेदीसाठी धांदल

मकर संक्रांती सणासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढत आहे. महिला मंडळींच्या हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी आवश्यक वाण खरेदी करण्यात येत आहेत. त्याबरोबरच तिळगूळ, रेवडी, सुगड आदींना मागणी वाढली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ जानेवारीलाच मकर संक्रांती सण साजरा होणार आहे. मात्र महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम महिनाभर चालत असतो.

असा आहे बाजारभाव

घेवडा १८० ते २०० रुपये किलो, गाजर ३० ते ४० रुपये किलो, वांगी ८० रुपये किलो, संक्रांतीची भाजी १० रुपये पेंढी तर गावरान तिळाचे दर २०० ते २४० रुपये किलो एवढे आहेत. हळदी- कुंकूसाठी लागणारे वाण १०० ते १२० रुपये किलो या भावाने विक्री करावी लागते आहे. तर तिळगूळ (पांढरे काटेरी) ६० ते ८० रुपये किलो या दराने मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT