Solapur News : गाव पातळीवर आमदार खासदारापेक्षा अधिक काम सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना गावत राहून करता येते त्या दृष्टिकोनातून गावच्या विकासासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्र येऊन विकासाचे धोरण समोर ठेवून काम करावे असे आवाहन विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्याच्या निवडणुकीतील खडकी, मानेवाडी, पाटखळ, निंबोणी, भाळवणी, ब्रह्मपुरी, बालाजीनगर,डिसकळ, अकोला, चिक्कलगी,लक्ष्मी दहिवडी, देगाव, आंधळगाव,जुनोनी, खुपसंगी, पडोळकरवाडी या गावातील नवनिर्वाचित सदस्याचा सत्कार जोगेश्वरी मंगल कार्यालयात करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मुज्जमील काझी,शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, संतोष रंदवे,माऊली कौडूभैरी, स्मिताताई अवघडे,माणिक गुंगे,संचालक संजय खरात सचिन वाघाटे उमेश मोरे,गणेश ननवरे,तात्या गडदे, दादासाहेब जाधव,
नितीन सरडे,तानाजी पाटील, अनिल आदलिंगे,काशिनाथ पाटील, तुकाराम चव्हाण, दादासाहेब जाधव, महादेव माळी,ज्ञानेश्वर भंडगे, आनंदा आंमुगे,ज्योतीराम चव्हाण,अर्जुन खांडेकर,मनोहर शिंदे, अमृत उमराणी, जोतीराम पवार, नवनाथ शिंदे, अनिल पाटील, लक्ष्मण शिंदे, शहाजान पटेल, विराज झंजे, सुनीता माळी, लहुजी लेंडवे, संजय रजपूत, सरूबाई लांडगे,सुनील थोरबोले अनेक सदस्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले की,गावातील जनता आणि विकास हाच केंद्रबिंदू मानून जनतेची सेवा करण्यासाठी मतदान रुपाने निवडून दिले. त्यातून केंद्र व राज्याच्या अनेक योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोचवाव्यात.
लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी गावासाठी प्रत्येक योजना अंमलात आणाव्यात त्यासाठी मी देखील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जयंत पाटील,खा. सुप्रिया सुळे,आ. रोहित पवार यांच्याकडे देखील पाठपुरावा करून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी तुमच्या सोबत राहीन असा शब्द अध्यक्ष पाटील यांनी यावेळी दिला. त्यावेळी भाळवणी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.