पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिर परिसरात एक तळघर आढळून आलं आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीचं तळघर आढळून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सात ते आठ फूट खोल अंतरावर हे तळघर आढळून आलं असून त्यात काही मुर्तीही आढळून आल्या आहेत. (Cellars found in Pandharpur temple need to know what is in the basement)
साम टिव्हीच्या वृत्तानुसार, कान्होपात्रा मंदिराजवळ हे तळघर आढळून आलं असून इथं पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी या मंदिरात दाखल झाले आहेत. या ठिकाणी असलेली माती सध्या बाहेर काढली जात आहे. जवळपास ४० ते ५० किलो माती बाहेर काढली जात आहे, त्याचंही परीक्षण केलं जाणार आहे.
दरम्यान, या तळघरात तीन ते चार दगडी मुर्त्या सापडल्या आहेत. तसेच एक पादुकाही सापडली आहे. पण या मुर्त्या नेमक्या कशाच्या आहेत? हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या ठिकाणी जे काही सापडतंय त्याची तपासणी करुन त्याचा संपूर्ण अहवाल हा राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याचंही कळतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.