सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील आजीकडे आलेल्या वर्षीय अल्पवयीन मुलीला विवाहाच्या आमिषातून तरुणाने पळवून नेली. त्याच्याविरुद्ध सुरवातीला वळसंग पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. नोव्हेंबर रोजी दोघेही मध्य प्रदेशातील सताना जिल्ह्यात राहू लागले. त्या अल्पवयीन मुलीला सध्या दहा महिन्यांचे बाळ असून त्या तरुणासह मुलीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल झाला असून उद्यापर्यंत (मंगळवार) न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली आहे.
आई-वडील पुण्यात राहायला असून आजीला कर्करोग झाल्याने तिच्या देखभालीसाठी त्यांनी वर्षीय मुलीला तिच्याकडे पाठविले. गावातील तरुणाने तिच्याशी ओळख वाढविली आणि दोघांचे एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाले. विवाहाच्या आमिषातून त्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले. जानेवारी रोजी त्या तरुणाविरुद्ध अपहरणाचा तर ते मिळून आल्यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. वळसंग पोलिसांनी त्यांचा शोध घेतला पण, त्यांचा शोध लागलाच नाही. शेवटी या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपविण्यात आला. त्यांनी दिवसांत त्या तरुणासह अल्पवयीन मुलीला पकडले. दरम्यान, त्या वेळी त्या अल्पवयीन मुलीला दहा महिन्यांचा मुलगा असल्याची बाब समोर आली.
ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक मोतिराम मोरे, पोलिस हवालदार मंजुळा धोत्रे, सविता कोकणे, सूर्यकांत जाधव, चरणसिंग रजपूत, सचिन वाकडे, लक्ष्मण राठोड, प्रीती पाटील यांच्या पथकाने केली. पोलिस उपनिरीक्षक अजय हंचाटे हे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.