shiv sena and ncp level of state politics has gone down Chhatrapati Sambhaji Raje sangola politics Sakal
सोलापूर

Sangola News : राज्याच्या राजकारणाची पातळी खालावली - छत्रपती संभाजी राजे

शिवसेना अन् राष्ट्रवादी सत्तेत आणि विरोधात देखील

दत्तात्रय खंडागळे

सांगोला : राज्यातील सध्याच्या राजकारणाची पातळी अतिशय खालावली आहे. एकाच पक्षातील एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधक अशी स्थिती पक्षात झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी सर्वसामान्यांसाठी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून पर्याय उभा केला असल्याचे मत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

'गाव तेथे शाखा आणि घर तेथे स्वराज्य' शाखांच्या उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे रविवार (ता. 6) रोजी सांगोल्यात आले होते. सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, पहिली भाजप शिवसेनेची नैसर्गिक युती होती.

त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली. आता शिवसेना अन् राष्ट्रवादी सत्तेत आणि विरोधात देखील आहे. सध्या राज्याच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आणि नेत्याकडून दुसऱ्या पक्ष आणि नेत्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तेच तेच राजकारणी पातळी सोडून बोलतात.

सांगोला तालुक्यात एमआयडीसी नाही, विकास कामांसाठी निधी मिळाला असला तरी, तालुक्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. नुसतं कमिशन...अन् कामे निकृष्ट झाली असून कुठे रस्ता निकृष्ट आहे ते मी दाखवतो असे थेट चॅलेंज देत छत्रपती संभाजीराजे यांनी राजकारण्यांवर सडकून टीका केली आहे.

२००७ पासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा विचार घेवून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. गाव तेथे घर तेथे स्वराज्य हा संकल्प घेवून महाराष्ट्रात फिरत आहे. मी जनतेला एक वेगळा पर्याय घेवून येत आहे.

स्वराज्याच्या माध्यमातून सामान्य माणूस असामान्य काम करू शकतो. शेवटपर्यंत संघर्ष करायचा ही आमच्या घराण्याची शिकवण आहे. लोकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मी अहोरात्र दौरे करीत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून मी खूपच अस्वस्थ झालो.

प्रास्ताविक अरविंद केदार यांनी केले. जिल्हाप्रमुख महादेव तळेकर, धनंजय जाधव, करण गायकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, जिल्हाध्यक्ष महादेव तळेकर, अरविंद केदार, संपर्क प्रमुख करण गायकर, महेश गवळी, सचिन महांकाळ, विशाल केदार, रणजित काळे, गणेश माने यांच्यासह स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

दिवसभर विविध ठिकाणांना दिल्या भेटी

छत्रपती संभाजी राजे यांनी तालुक्यातील दिवसभर तालुक्यात डाळिंब बागांची पाहणी केली, शहरात सुरू असलेला छावणी चालकांच्या आंदोलनात भेट दिली, मान नदी परिसरातील पाहणी, चिंचोली तलाव व राज्यात प्रसिद्ध असणारा जनावरांच्या बाजारात भेट देऊन तेथील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT