अंतिम आदेश निघेपर्यंत उपोषण सुरूच राहणार : शिवतेजसिंह Canva
सोलापूर

अंतिम आदेश निघेपर्यंत उपोषण सुरूच राहणार : शिवतेजसिंह

अंतिम आदेश निघेपर्यंत उपोषण सुरूच राहणार : शिवतेजसिंह

शशिकांत कडबाने

अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी 22 जूनपासून अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे.

अकलूज (सोलापूर) : साखळी उपोषणास उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने ग्रामस्थांनी साखळी उपोषण (Fasting) अंतिम आदेश निघेपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील (Shivtej Singh Mohite-Patil) यांनी दिली. अकलूज (Akluj) - माळेवाडी (Malewadi) ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते (Natepute) ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी 22 जूनपासून अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या 35 व्या दिवशी उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी उपोषणस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. (Shivtej Singh said that the fast will continue till the final order of the Municipal Council is issued-ssd73)

शिवतेजसिंह म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र शासनास तीन आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचा आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती. परंतु, गावातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर जोपर्यंत अंतिम नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवावे, असा निर्णय सर्वांनीच घेतला. त्यानुसार साखळी उपोषण सुरूच राहणार असून उच्च न्यायालयापुढे सादर होणाऱ्या शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे शिवतेजसिंह यांनी सांगितले.

उपोषणात भाजप (BJP) युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष दिग्विजय माने-पाटील, गणेश वसेकर, संजय साठे, माजी सरपंच दादासाहेब मोरे, माजी उपसरपंच बाळासाहेब सणस, तुकाराम टिंगरे, उपसरपंच धनंजय सावंत, भाजपा शहर सरचिटणीस शैलेश दिवटे, राजू गोरे, लालासाहेब अडगळे, बाळासाहेब वाईकर, सुनील काशिद, विठ्ठल खंडागळे, सागर बनसोडे, तानाजी शिंदे यांच्यासह पत्रकार संघटनेने सहभाग घेतला तर पंढरपूरच्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मीनाक्षी जगदाळे, मनोरमा लावंड, मनीषा गायकवाड, पूनम सुसलादे, शुभांगी क्षीरसागर, शारदा चव्हाण यांनी उपोषणात सहभाग घेऊन पाठिंब्याचे निवेदन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT