Shocking Murder Over alcohol Dispute Friend Arrested Sakal
सोलापूर

Solapur Crime News : धक्कादायक! दारूसाठी डोक्यात दगड घालून मित्राचा खून, आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून नागेश आण्णाराव चिक्काळे (वय ३५, रा. कल्याण नगर भाग-२) याने मित्र विनायक कामन्ना हक्के (वय २६, रा. जामगाव, ता. मोहोळ) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे उघड झाले आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विजापूर नाका पोलिस व शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या नऊ तासांच संशयिताला जेरबंद केले आहे.

सोमवारी (ता. १) सकाळी साडेनऊच्या सुमारास विजापूर नाका पोलिसांना आसरा चौक परिसरातील शारदा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत एका तरूणाचा खून झाल्याची खबर मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली होती.

पोलिस आयुक्त एम राज कुमार, उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या आदेशानुसार विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनीही आपल्या पथकांना आरोपीच्या शोधासंदर्भात सूचना केल्या होत्या.

त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब मोरे, संजय क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वाखालील पोलिस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, अनिल जाधव, कुमार शेळके, इम्रान जमादार, विनोद रजपूत, संदिप जावळे यांच्या पथकाने संशयित आरोपीला अवघ्या काही तासांतच जेरबंद केले. पोलिस आयुक्तांनी या पथकाच्या कामगिरीचे कौतूक केले आहे.

दारूसाठी तगादा अन्‌ शिवीगाळीतून कृत्य

मयत विनायक हक्के हा आजीकडे कल्याण नगर भागातच राहायला होता, पण तीन-चार वर्षांपूवी तो शेती करण्याच्या निमित्ताने गावी (जामगाव, ता. मोहोळ) येथे राहायला गेला होता. तरीपण, अधूनमधून तो सोलापुरात यायचा. दोन-तीन दिवसांपूर्वी तो आजीकडे आला होता.

रविवारी (ता. ३०) मयत विनायक व संशयित आरोपी नागेश चिक्काळे दोघेजण दिवसभर दारू पित होते. रात्री दोघेजण आसरा चौक परिसरातील शारदा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत दारू प्यायला बसले. त्यावेळी अजून दारू पाज म्हणून मृत शिवीगाळ करीत होता. त्या रागातून हे कृत्य केल्याची कबुली नागेश चिक्काळे याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बाटल्या, ग्लास ठरला तपासाचा दुवा

विनायक व नागेश दोघेजण दारू प्यायला जाताना त्यांनी ज्या दुकानातून दारू व ग्लास विकत घेतले, त्या दुकानदाराने त्या दोघांना एकत्र पाहिले होते. तसेच घटनास्थळापासून जवळच सीसीटीव्ही होता. आजूबाजूच्या काहींनी त्या दोघांना पाहिले होते. मित्राचा खून करून संशयित आरोपी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता, पोलिसांनी त्याला अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT