siddheshwar sugar factory solapur sakal
सोलापूर

श्री सिद्धेश्वर कारखान्याचा महापालिकेकडे अर्ज! ९२ मीटर अनधिकृत चिमणी पाडली, आता त्याच जागेवर ३० मीटर ‘चिमणी’ला मागितली परवानगी

कारखाना प्रशासनाने त्याच जागेवर ३०मीटर चिमणी बांधकामाला परवानगी द्यावी, असा अर्ज महापालिकेकडे केला आहे. कारखान्याने ऑनलाइन अर्ज केला. आठ-दहा दिवसांपूर्वी कारखान्याने तसाही अर्ज केला, पण अद्याप महापालिकेकडून त्यावर निर्णय झालेला नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९२ मीटर अनधिकृत चिमणी पाडल्यानंतर आगामी गाळप हंगाम घेता यावा म्हणून कारखाना प्रशासनाने त्याच जागेवर ३० मीटर चिमणी बांधकामाला परवानगी द्यावी, असा अर्ज महापालिकेकडे केला आहे. ऑफलाइन अर्ज केल्यावर कारखान्याला ऑनलाइन अर्ज करायला लावला. आठ-दहा दिवसांपूर्वी कारखान्याने तसाही अर्ज केला, पण अद्याप महापालिकेकडून त्यावर निर्णय झालेला नाही.

साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरु होईल, अशी सद्य:स्थिती आहे. तत्पूर्वी, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याला त्यांच्या सभासदांचा ऊस गाळप करता यावा या हेतूने पहिल्या चिमणीच्या जागेवरच नवीन ३० मीटर चिमणी बांधकामाला परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी कारखाना प्रशासनाची आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो होवू शकला नाही.

दरम्यान, नवीन ३० मीटर चिमणी बांधकामासाठी साधारणतः दीड ते दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लवकर परवानगी द्यावी, अशी अपेक्षा कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली आहे. पूर्वी महापालिकेने तेवढ्या उंच चिमणीसाठी परवानगी दिली होती, असेही श्री. काडादी यांचे म्हणणे आहे.

महापालिकेची सावध भूमिका...

होटगी रोडवरील विमानतळास प्रमुख अडथळा असलेली श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची ९२ मीटर अनधिकृत चिमणी महापालिकेने जूनमध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात पाडली. त्यानंतर दोन महिन्यात विमानसेवा सुरु होईल, अशी सोलापूरकरांना आशा होती. परंतु, अजून विमानसेवेची प्रतीक्षाच आहे. दरम्यान, आहे त्याच जागेवर ३० मीटर परवानगी देण्यापूर्वी काही तांत्रिक अडचणी येतील का, याची पडताळणी महापालिकेकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे. नवीन चिमणीसाठी कारखान्याने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आता परवानगी कधी मिळणार, याकडे २० हजार शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे.

हंगामापूर्वी चिमणी बांधता यावी एवढीच अपेक्षा

पूर्वीच्याच जागेवर ३० मीटर चिमणी उभारण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज महापालिकेकडे दिला आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर आता गाळप हंगामापूर्वी चिमणी उभारता यावी म्हणून वेळेत परवानगीची आशा आहे.

- धर्मराज काडादी, मार्गदर्शक संचालक, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT