Solapur Rain Update sakal
सोलापूर

Solapur Rain Update : सिध्दापूर वडापूर बंधारा पाण्याखाली, पुर्व भागाचा संपर्क तुटला

उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाल्याने तालुक्यातील सिद्धापूर वडापूर हा बंधारा पाण्याखाली गेला असून पूर्व भागातील वाहतूक सध्या बंद करण्यात आली.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाल्याने तालुक्यातील सिद्धापूर वडापूर हा बंधारा पाण्याखाली गेला असून पूर्व भागातील वाहतूक सध्या बंद करण्यात आली.

उजनी धरणातून काल सायं.5.00 वाजता 1 लाख 25 हजार क्युसेकचा तर वीर धरणातून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. संगम येथून दुपारी 3.00 वाजेपर्यंत 1 लाख 37 हजार 860 क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. तालुक्यात उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी, माचणूर, तामदर्डी, रहाटेवाडी, तांडोर, सिद्धापूर,अरळी, ही गावे भिमेच्या काठावर येत आहेत पुराच्या पाण्यामुळे नदीपात्रात असलेल्या मोटारी शेतकऱ्यांनी काढून ठेवल्या.

दरम्यान तहसीलदार मदन जाधव यांनी यापूर्वीच नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे सूचना महसूल प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या आहेत.या गावातील तलाठ्यानाही दक्ष राहण्याच्या सुचना दिल्या.

काल सायंकाळच्या दरम्यान सिद्धापूर वडापूर हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे पूर्व भागात दक्षिण सोलापूर व मोहोळ तालुक्याची सहभाग भागातील शेतकऱ्यांचा संपर्क तुटलेला आहे पुराच्या पातळीत वाढ झाल्यास शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गतवर्षी नदीपात्रात पाणी न आल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नावर मोठा परिणाम झाला तर आता अधिकचे पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे .दरम्यान नदीपात्रात पाण्याबरोबर सध्या उजनी कालव्यातून पाणी सोडण्यात यावे व त्या पाण्यातून नंदूर, बोराळे, डोणज मुंडेवाडी, रहाटेवाडी, अरळी, या भागातील पाझर तलाव देखील भरून द्यावेत अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने राजकुमार स्वामी यांनी जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्याकडे केली.

उजनी व वीर धरणातील अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे हे पाणी भीमा नदीच्या पत्रातून कर्नाटकला वाहून जात आहे त्यामुळे या वाया जाणाऱ्या पाणी अडवण्याच्या दृष्टिने वडापूर जवळ नदीपात्रात थांबेल इतक्या पाण्याचा साठा होईल अशा पद्धतीचा बॅरेज करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. जेणेकरून या भागातील शेती व शेतकरी टिकून शेतकरी जगला जाईल अन्यथा हे वाया जाणारे पाणी पहात बसण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यावर येणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT