सोलापूर : होम मैदानावर इलेक्ट्रिकल साहित्य घेऊन काडीपेटीने दोन अल्पवयीन मुलांनी आग लावली. तो भडका जवळच असलेल्या ओएफसी फायबर केबलच्या बंडलला लागला. या आगीत ८ केबल बंडल जळून खाक झाले. दोन ड्रम फोम केमिकल आणि चार गाड्यांच्या पाणी फवारणीनंतर तासाभरात आग आटोक्यात आली. दोन मुले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज महापालिकेने पोलिसांकडे दिले आहेत.
महापालिकेच्या वतीने शहर हद्दीत १०० किमी अंतरावर डक्टमधून ओएफसी केबल घालण्यासाठी मक्तेदारांनी एक हजार फायबर केबलचे बंडल होम मैदानावर ठेवले होते. त्यातील काही काम झाले आहे. दरम्यान तेथील फायबर केबल बंडलला मंगळवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास आग लागली. आग मोठी असली तरी ही मोकळे मैदान असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, याठिकाणी असलेल्या एकूण फायबर केबलच्या बंडलमधील एकावर एक रचलेले तब्बल ८ केबल बंडल आगीमध्ये भस्मसात झाले आहेत.
या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाकडून घटनास्थळी चार पाण्याच्या गाड्या दाखल झाल्या. या पाण्यात फोम केमिकल घालून पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे रणरणत्या उन्हात भडकलेली आगआटोक्यात आणण्यास मदत झाली. या आगीत मक्तेदाराचे साधारण अडीच लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती
महापालिका प्रशासनाने दिली.
होम मैदानावर आग लागल्या संबंधीची माहिती फोनवरून अग्निशामक दलाकडे प्राप्त झाली. ताबडतोब पाण्याच्या गाड्या दाखल झाल्या. एकावर एक केबल बंडल रचल्याने आगीने मोठा भडका घेतला होता. केमिकलचा वापर करून आग लवकर आटोक्यात आणली गेली. त्यामुळे आजूबाजूला अस्थाव्यस्थ पडलेले केबल बंडल सुरक्षित राहिले आहेत.
- केदार आवटे,अग्निशामक विभागप्रमुख
केबलच्या एका बंडलमध्ये साधारण १०० मीटरचे काम होते. असे एकूण ८ बंडल आगीत जळून खाक झाले आहेत. एकूण बंडल आणि जळालेले व अस्तित्वात असलेले याची तपासणी केली. बाकी सर्व सुरक्षित आहेत.
- संदीप कारंजे, नगरअभियंता
होम मैदानावरील टेलिकॉम कंपन्यांची केबल हटवून, वॉकिंगसाठी येणाऱ्यांची अडचण दूर करावी. केबलमुळे तेथे अस्वच्छता असल्याचे नगरअभियंता कारंजे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
- श्रीदेवी फुलारे, माजी नगरसेविका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.