Solapur Assembly Election  sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : आमदार होण्यासाठी पाऊणलाखावर मतदान आवश्यकच

Solapur VidhanSabha Election 2024 : जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील स्थिती; १२.४२ लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, माळशिरस या पाच विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने दुरंगी लढत झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये जो उमेदवार ८० ते ९० हजार मते घेईल तोच आमदार, असे समीकरण मतदानाच्या आकडेवारीतून दिसत आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, माळशिरस या पाच विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने दुरंगी लढत झाली आहे. यातील शहर उत्तर मतदारसंघ वगळता उर्वरित सर्वच मतदारसंघात दोन लाखांहून अधिक मतदान झाले आहे.

त्यामुळे अक्कलकोट, बार्शी, मोहोळ व माळशिरस या मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये जो उमेदवार ८० ते ९० हजार मते घेईल तोच आमदार, असे समीकरण मतदानाच्या आकडेवारीतून दिसत आहे.

महायुतीच्या विद्यमान आमदारांना या निवडणुकीत महिलांची वाढलेली पावणेदोन लाख मते आपल्या विजयात मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास आहे.

विधानसभेपूर्वी सोलापूर जिल्ह्यात ‘शहर मध्य’ वगळता उर्वरित १० मतदारसंघातील आमदार महायुतीचेच होते. पण, यंदा शहर मध्यची जागा भाजप जिंकेल अशी स्थिती आहे. त्यामुळे ११ पैकी ११ जागा महायुतीच्या येणार का?, सर्वच मतदारसंघातील विद्यमान आमदारांचा ‘मी पुन्हा येईन’चा शब्द खरा ठरणार का? याची खात्रीशीर उत्तरे अद्याप कोणाकडेही नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

पण, अक्कलकोटमध्ये १२, बार्शीतून २०, मोहोळमधून १०, शहर उत्तरमधून २० आणि माळशिरसमधून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तरीदेखील त्या मतदारसंघातून आमदार होण्यासाठी यावेळी उमेदवारांना किमान ७५ हजारांहून अधिक मते घ्यावीच लागतील, हे निश्चित आहे. कारण, तेथे उमेदवार जरी जास्त असले तरी प्रमुख लढती दुरंगीच झाल्या आहेत.

सव्वासहा लाख बहिणींनी मतदानच केले नाही

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात एकूण ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार आहेत. त्यात १३ लाख १७ हजार ३६४ पुरुष आणि ११ लाख ९९ हजार ९१२ महिला मतदार आहेत. बुधवारी (ता. २०) जिल्ह्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाकडे तब्बल १२ लाख ४२ हजार २९८ मतदारांनी पाठ फिरविली. त्यात सहा लाख ३६ हजार ८६० लाडक्या बहिणींचा समावेश असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यात महायुती व महाविकास आघाडीचा परंपरागत मतदार असून त्याचाही फटका निश्चितपणे कोणाला ना कोणाला बसणार आहे.

पाच मतदारसंघातील मतदान व महिला मतदार

मतदारसंघ एकूण

मतदार मतदान केलेल्या महिला एकूण झालेले मतदान

अक्कलकोट ३,८३,४७९ १,२१,०७३ २,५५,०२६

बार्शी ३,३७,४९९ १,१७,३८७ २,४६,७१२

शहर उत्तर ३,२८,५७२ ९४,०२३ १,९१,३९४

मोहोळ ३,३१,४५८ १,०७,१२७ २,३०,८५०

माळशिरस ३,४९,५६८ १,१२,८९७ २,४०,८५१

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT