सोलापूर (कुर्डुवाडी) : अनेक मुले मोबाईलवर गेम्स खेळतात. काही गेम्स प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करताना किंवा ऑनलाईन गेम्स खेळताना वेपन, कॉईन आदी घेतले जातात. पण जर ॲप किंवा मोबाईल आपल्या बॅंकेच्या अकाउंटशी जोडलेले असेल तर आपल्या अकाउंटमधुन पैसे कट होऊ शकतात. हे टाळण्यासाठी ऑनलाईन गेम्सबाबत मुलांनी व पालकांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
सध्या बहुतांश लोकांना मोबाईलमधील गेम्सचे आकर्षण आहे. मुलांना तर मोबाईल हातात पडला की केंव्हा गेम्स खेळतोय असे होते. गेल्या दिड वर्षात कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी घरातील जवळपास सर्वांकडे मोबाईल आला आहे. अनेकांच्या घरी वायफाय सुविधा घेण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन गेम्स खेळताना डाटाची कमतरता भासत नाही. अनेक शालेय व महाविद्यालयीन मुले-मुली या गेम्सबाबत ॲडिक्ट झाल्यासारखे चित्र आहे.
लहान मुले प्ले स्टोअरवर जातात व तिथे हवी असेल ती गेम डाउनलोड करुन घेतात. अनेक पालकांचे बॅंक अकाउंट मोबाईलमधील विविध ॲपना ब-याचवेळा कनेक्टेड असते. अनेक गेम्स तर डाउनलोड करतानाच पैसे पे करावे लागतात. तेंव्हा त्याची रक्कम खात्यातुन कट होते. काही गेम्स मध्ये मुलांना खेळण्यासाठी वेपन, कॉईन, जॅकेट, कॅप, सुरक्षाचक्र, व्हेईकल, मॅजिक पिस्टल यासह अनेक कॉईन घ्यावे लागतात. त्यांची किंमत ५० रुपयांपासुन हजारापर्यंत असते. खेळताना मुले हे कॉईन घेतात व त्याचे पैसे खात्यातुन कट होतात. या कट झालेल्या पैशांचा मेसेज अनेकवेळा येत नाही त्यामुळे पालकांना कळतही नाही.
काहींना बॅंक स्टेटमेंट चेक करण्याची सवय ही नसते. परंतू जेंव्हा केंव्हा बॅंक स्टेटमेंट काढले जाते तेंव्हाच कट झालेले कळते. हे टाळण्यासाठी शक्यतो स्वतः किंवा मुलांनी ऑनलाईन गेम्स खेळताना मोबाईलमधील सेटिंग बदलावी. सर्व ॲप ना बॅंक अकाउंट कनेक्ट करु नये. गेम खेळताना पैसे कट होणारे कॉइन किंवा इतर काही शक्यतो विकत घेउ नये. मुलांना मोबाईलचा योग्य वापर करण्याबाबत सर्व माहिती द्यावी. आपली मुले मोबाईल वर कोणत्या प्रकारचे गेम्स खेळतात याबाबत पालकांना माहिती आवश्यक आहे. योग्य ती काळजी घेतल्यास आपल्या खात्यातील रक्कम कट होण्यापासुन वाचु शकते.
"लहान मुले मोबाईलवर कोणत्या प्रकारचे गेम्स खेळतात याकडे पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे. पैसे खात्यातुन कट होतात असे वाटल्यास त्याबाबत सर्व माहिती मुलांना दिली पाहिजे. मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. पालकांनी देखील मुलांना मैदानावर खेळण्यासाठी न्यावे."
- विक्रांत बोधे, सहायक पोलिस निरिक्षक, कुर्डुवाडी पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.