धर्मराज काडादी sakal
सोलापूर

Solapur : सिद्धेश्वरच्या चिमणीमुळे पेच ! कोणता झेंडा घेऊ हाती; काडादींसमोर ‘धर्म’संकट

भाजपनेच चिमणी पाडली, असा मेसेज त्यांच्या माध्यमातून बाहेर पसरला आहे

सकाळ वृत्तसेवा

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनची अनधिकृत चिमणी पडणारच नाही, असा अनेकांना विश्वास वाटत होता. कारखान्यावर अवलंबून एक लाख लोकांचा विचार सरकार व शहर-जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करतील, असे देखील अनेकांना वाटत होते. पण विमान उड्डाणासाठी प्रमुख अडसर असलेली चिमणी १५ जून रोजी पाडण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काडादींना धीर दिला.

भाजपनेच चिमणी पाडली, असा मेसेज त्यांच्या माध्यमातून बाहेर पसरला आहे. आता विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी काडादींनी ठेवावी, असे आवाहन देखील त्या नेत्यांनी केले. पण आतापर्यंत कोणत्याही पक्षाचे लेबल न लागलेले काडादी विधानसभा निवडणूक लढविणार का आणि निवडणुकीस उभारण्याची तयारी झालीच तर कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. काडादींसमोर आता कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- प्रतिनिधी

१९७२ पासून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, तुळजापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार आहे. स्पर्धेच्या काळात श्री सिद्धेश्वर कारखान्याभोवती अनेक साखर कारखाने उभारल्याने शेतकऱ्यांना पर्याय निर्माण झाले. तरीपण श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची सभासद संख्या व कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली नाही

आमदार सचिन कल्याणशेट्टी अनेकदा म्हणाले, की तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडण्यात सिद्धेश्वर कारखान्याचा मोठे योगदान राहिले आहे. दरम्यान, सध्या कारखान्याच्या चिमणी पाडकामामागे भाजपचे तथा भाजपमधील काही आमदारांचे षड:यंत्र असल्याचा आरोप धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यांचा रोष भाजपचे दोन विद्यमान आमदार तथा माजी मंत्र्यांवर होता.

त्यामुळे काडादी आता शहर उत्तर की दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. शहर उत्तरपेक्षा दक्षिण सोलापूर हा विधानसभा मतदारसंघ त्यांना सोयीचा वाटत असल्याचेही बोलले जात आहे. पण काडादी स्वत: की त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रणांगणात उतरणार की गड्या आपण अन्‌ आपल्या संस्थाच बऱ्या, अशी त्यांची भूमिका कायम असणार हे आगामी काळाच ठरवेल, हे निश्चित!

महेश कोठेंना मिळाले ‘उत्तर’

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनची चिमणी पाडल्यानंतर माजी महापौर महेश कोठे यांनी धर्मराज काडादी यांची भेट घेतली. त्याठिकाणी जावून त्यांनी काडादींसह कामगारांना धीर दिला. त्यावेळी माजी आमदार नरसय्या आडमही उपस्थित होते. आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून काँग्रेस, शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलेल्या कोठेंना काडादींची साथ अपेक्षित आहे. त्या माध्यमातून आपण शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निश्चितपणे तगडी फाईट करू, असा विश्वास त्यांना असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT