solapur sakal
सोलापूर

Solapur : आयुष्यभर देशासाठी झिजलेला देह, वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांसाठी दान

स्वातंत्र्य सैनिक सतीश शेडजाळे यांचा आदर्श; वारसांना वडिलांचा सार्थ अभिमान

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - मरावे पण कीर्तिरूपे उरावे हे समर्थ रामदासांचे बोधवाचन आहे. मनुष्य हा केव्हा तरी मरणारच परंतु तरी सुद्धा मनुष्य एकप्रकारे जिवंत राहू शकतो ते म्हणजे कीर्तीच्या रूपाने. कीर्तीच्या रूपाने जिवंत राहण्यासाठी अवयवदान, नेत्रदान, देहदान हा एक चांगला मार्ग आहे. सोलापुरातील स्वातंत्र्य सैनिक सतीश ऊर्फ प्रभुलिंग शेडजाळे देहदान केले. शेडजाळे हे जिवंत असताना देशासाठी लढले, मरणानंतर देहदान करून ते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरल्याचे आदर्श उदाहरण सोलापुरात घडले आहे.

२८ जून १९२३ रोजी जन्मलेले सतीश शेडजाळे हे स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जात. देशभक्त कै. तुळशीदासदादा जाधव व भाई छन्नुसिंग चंदेले यांच्यासोबत ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. ब्रिटिशांची असलेली तरटीनाका पोलिस चौकी नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी त्यावेळी मल्लिकार्जुन मंदिरात बॉम्ब ठेवला होता.

या घटनेचा पोलिस तपास होत असताना, स्वातंत्र्य सैनिक शेडजाळे तीन वर्षांसाठी हैदराबादला भूमिगत झाले होते. त्यावेळी इंटर बीएपर्यंत शिक्षण घेतलेले शेडजाळे हे उच्चशिक्षित होते. २८ जुलै २०१२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्युपूर्वी तब्बल १५ वर्षे अगोदर त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. १९९७ मध्ये त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला व लिखित प्रक्रिया पूर्ण करून घेतली.

२०१२ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात त्यांचे देहदान झाले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मानवी देहाची आवश्‍यकता असते. विद्यार्थ्यांना मानवी देह उपलब्ध झाल्यास त्यातून कुशल डॉक्टर घडतात. या डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णसेवा होते.

स्वातंत्र्य सैनिक शेडजाळे यांना अनिल व अजित ही दोन मुले व अरुणा ही मुलगी आहेत. आपल्या वडिलांनी त्यावेळी घेतलेला देहदानाचा निर्णय आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे अजित शेडजाळे यांनी सांगितले.

आमच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर देहदानाची प्रक्रिया करण्यासाठी आम्ही सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गेलो. त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक असलेल्या मानवी देहाचे महत्त्व व गरज लक्षात आली.

देहदानाचा टक्का वाढला पाहिजे. देहदान, अवयवदान व नेत्रदानातून आपण मरणानंतरही समाजासाठी उपयुक्त ठरु शकतो. ज्या वेळी देहदान, अवयवदान व नेत्रदानाची चळवळ फारशी व्यापक नव्हती, त्यावेळी आमच्या वडिलांनी घेतलेला निर्णय म्हणजे त्यांची दूरदृष्टी व सामाजिक भान किती सजग होते याची कल्पना येते.

अजित शेडजाळे (सतीश शेडजाळे यांचे पूत्र)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT