mumbai crime theft case thief sell gas cylinder in scrap police Sakal
सोलापूर

Solapur : वाळूवरील कारवाई रोखण्यासाठी मागीतली लाच; तलाठी व ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

5000 रुपयाची लाच घेताना गाव कामगार तलाठी व ग्रामपंचायत कर्मचारी लाचलुचपत पथकाला रंगेहाथ सापडले.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - प्रांत कार्यालयातील तलाठी लाच प्रकरण ताजे असतानाच आज तालुक्यातील बठाण येथे वाळू चोरीच्या वाहनावरील कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून 5000 रुपयाची लाच घेताना गाव कामगार तलाठी व ग्रामपंचायत कर्मचारी लाचलुचपत पथकाला रंगेहाथ सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली.

या प्रकरणाची सविस्तर हकिकत अशी, की तक्रारदार त्याच्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकामासाठी वाळू कमी पडली सदरची वाळू नदी पात्रातून घेऊन जात असताना ग्रामपंचायत कर्मचारी श्रीमंत मसाजी भालेराव वय 50 राहणार बठाण व गाव कामगार तलाठी गजानन शंकर चाफेकर वय 32 पद तलाठी सज्जा मुढवी अतिरिक्त पदभार बठाण रा. उमरवटी तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांनी यावर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून न करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची जी मागणी करून ती लाच स्वीकारत असताना लाच लुचपत पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत पथकाचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पकाले, पोलीस कॉन्स्टेबल चेतन नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किनगे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड, यांच्या पथकाने केली.

दोन महिन्यापूर्वी भूसंपादनाचा मोबदला देण्यावरून प्रांत कार्यालयातील तलाठी सुरज नळे यांनी त्याच्या हस्तकामार्फत लाच घेण्याचा प्रयत्न केला यावरून प्रांत कार्यालय बदनाम ठरले होते ही घटना ताजी असतानाच आज तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठ्याने पाच रुपये लाच घेताना सापडल्याने पुन्हा तहसील कार्यालय बदनाम झाले.

एकूणच सर्वसामान्य नागरिकाला त्रास देण्यात महसूल खाते मंगळवेढ्यात अव्वल ठरू लागले आहे. या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडल्यामुळे तक्रारदारांना शेवटी लाचलुचपत पथकाचा आधार घ्यावा लागत आहे.

या घटनेवरून सिद्ध झाले आहे तालुक्यातील आणखीन काही प्रमुख शासकीय कार्यालये सध्या लाचलुचपत पथकाच्या रडारवर असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली. घरकुल बांधकामासाठी शासनाची मोफत वाळू देण्याचा निर्णय अजून कागदावर असून प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे अशा घटना घडू लागल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT