solapur koimbtur express esakal
सोलापूर

Solapur : कोईमतूर एक्स्प्रेस धावणार नव्या रूपात

‘एलएचबी’ डब्यांसह २५ नोव्हेंबरपासून नियमित सुरू

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरकरांचा मुंबई-कोईमतूर रेल्वे प्रवास सुरक्षित व अधिक गतिमान होणार आहे. कारण, मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-कोइंबतूर एक्स्प्रेसच्या पारंपरिक रेकचे एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला असून २५ नोव्हेंबरपासून नव्या रूपात, नव्या ढंगात ही गाडी धावणार आहे.

मुंबई-कोईमतूर ही गाडी दररोज धावणार आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारित एलएचबी रेक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. २५ नोव्हेंबरपासून मुंबई येथून तर २७ नोव्हेंबरपासून कोईमतूर येथून हा रेक जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-कोईमतूर एक्सप्रेस नव्या रेकमुळे जुन्या डब्यांपासून मुक्ती मिळणार आहे. सोलापूरकरांचा प्रवास आता सुरक्षित व आरामदायी होणार आहे.

अशी असणार गाडीची रचना

एक फर्स्ट एसी, चार एसी-२ टियर, दहा एसी-३ टियर, दोन स्लीपर क्लास, दोन जनरल सेकंड क्लास, एक जनरल सेकंड क्लास लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन, एक पँट्री कार आणि एक जनरेटर कार असणार आहे. २५ नोव्हेंबरपासून सुटणाऱ्या गाडी क्रमांक ११०१३ चे आरक्षण बुकिंग ११ ऑक्टोबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि https://www.irctc.co.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे.

‘एलएलबी’ची वैशिष्ट्ये

पूर्वी एक्सप्रेस, सुपरफास्ट दर्जाच्या गाड्यांना आयसीएफचे डबे वापरले जात होते. मात्र, एलएचबीचे रेक आधुनिक पद्धतीने बनविण्यात आल्याने हे डबे अपघात झाल्यास एकमेकांवर आदळत नाहीत. अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता कमी प्रमाणात असते. एलएचबी म्हणजे (लिंक हॉपमन बुश) होय. या डब्यांची निर्मिती जर्मन तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. यासाठी स्टीलनेस स्टीलचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे एलएचबीचे डबे वजनाने इतर डब्यांच्या वजनापेक्षा बारा टनांनी हलके असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT