Solapur Corona Update Sakal
सोलापूर

Solapur Corona Update : सोलापुरात कोरोनाने रुग्णाचा मृत्यू; देगाव परिसरात आढळला एक कोरोना बाधित रुग्ण

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट जेएन-१ या आजाराने देशात शिरकाव केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Solapur Corona Update: देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट जेएन-१ या आजाराने देशात शिरकाव केला आहे. सोलापूर शहरात नव्या व्हेरियंट जेएन-१ या या आजाराचा रुग्ण आढळला नाही, मात्र शहरात कोविड -१९ चे सध्या एकूण सात रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी एका रुग्णाचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह निघाला आहे तर ३१ डिसेंबर रोजी एका वृद्ध रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला.

भवानी पेठ परिसरातील ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोना आजाराने मृत्यू झाला. या रुग्णास रक्तदाब मधुमेह होता. शिवाय त्यांच्यावर बायपास सर्जरी देखील झालेली होती. या आजारपणात त्यांना सारखे झटके येत होते. यातूनच त्यांना नातेवाईकांनी सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते.

यावेळी त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना ३१ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची व या संदर्भात रुग्णालयाकडून मृत्यू अहवाल देखील प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी  दिली. जे.एन.१ या नव्या व्हेरीएन्टचा हा रुग्ण होता का हे अद्याप समजले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिवसभर केलेल्या कोरोना चाचण्यातून देगाव शिवारातील नव्याने आणखी एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. शहरात दिनांक २२ डिसेंबरपासून आतापर्यंत तेरा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामधील एकाचा मृत्यू झाला आहे.

४ रुग्ण तातडीच्या उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर शहरातील शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात ५ पुरुष आणि २ महिला असे ७ बाधित रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या मागील दोन लाटेत शहरातील ६ लाख ४३ हजार २९९ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या यामध्ये ३४ हजार ८०४ रुग्ण बाधित आढळून आले होते तर १५२० रुग्ण दगावले होते. यामध्ये ९७० पुरुष तर ५५० महिलांचा समावेश होता. शहरातील महापालिकेसह खासगी रुग्णालय देखील विविध उपायोजनांसह रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज झाले असून त्यांना प्रशासनाने विविध सूचना दिल्या आहेत. 

लक्षणे दिसताच तपासणी आवश्‍यक

कोरोनाच्या या अनुषंगाने महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून सर्व त्या विविध उपाय योजना आखण्यात आले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात गोळ्या औषध देखील उपलब्ध आहेत.

शिवाय रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याचे नियोजन ही करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांमध्ये टेस्टिंग उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी पण संशयित रुग्णांनी या संदर्भात संपर्क साधून कोरोनाच्या चाचण्या वेळीच करून घ्याव्यात.

कोणीही अंगावर काढू नये. आजारी रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन महापालिकेच्या प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT