Solapur Crime SakaL
सोलापूर

Solapur Crime : नव्या दमाच्या पोलिस अधिकाऱ्याची अवैध दारू, मटका, गुटखा अन्‌ वाळू माफियांमध्ये दहशत

वारीमुळे कारवाईची मोहीम संथ होती

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा - येथील पोलिस ठाण्याचा पदभार आयपीएस दर्जाच्या प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्याकडे मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचा सपाटा लावला. अवैध धंद्यांवर कारवाईसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. वारीमुळे कारवाईची मोहीम संथ होती, मात्र याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करून जुन्या गुन्ह्यांच्या तपासासह अवैध व्यवसायांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर कारवाईला आणखी गती प्राप्त झाली आहे.

प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाईची मोहीम उघडली असून, मटका घेणाऱ्या एजंटासह तब्बल ६१ जणांवर गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतानाच, जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई करून रोख रक्कम, आठ दुचाकी, सहा मोबाईलसह पाच लाख २६ हजार ८४० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. आतापर्यंतच्या कारवाईमध्ये ही सर्वोत्तम कारवाई ठरली.

मल्लेवाडी येथे मटका बुकीचालक सिद्धेश्वर सलगर याच्या शेतातील एका खोलीत कल्याण, मुंबई नावाचा मटका जुगार अड्डा मंगळवेढा, जत, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील एजंटाला हाताशी धरून चालत असल्याची माहिती मिळताच छापा टाकला.

बुकीचालक सलगरच्या मदतीला सुभाष घोगरे, महादेव ढेकळे, बिभीषण सलगर, तानाजी मेटकरी, संभाजी ढेकळे, सुरेश हजारे असे घटनास्थळी मिळून आले.

दुसऱ्या घटनेत दामाजीनगर येथील हनुमान मंदिरात सिद्धेश्वर दत्तू यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळत असताना टाकलेल्या धाडीत भारत नागणे (वय ५१, रा. नागणे गल्ली), सिद्धेश्वर दत्तू (वय ५५), संभाजी जाधव (वय ५७), सिद्धेश्वर सोमदळे (वय ४९, तिघे रा. दत्तू गल्ली), दामोदर यादव (वय ६४, रा. जय भवानीनगर), संजय मोरे (वय ४०, दामाजीनगर),

शिवाजी सूर्यवंशी (वय ५१, रा. तळसंगी) यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता रोख रक्कम २१ हजार ८४० रुपये मिळून आले. त्यांच्याकडून आठ मोटारसायकली (किंमत चार लाख ३० हजार रुपये) व ते वापरत असलेले विविध कंपन्यांचे पाच मोबाईल (किंमत ६५ हजार रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसऱ्या घटनेत नंदूर येथील दोन किराणा दुकानांत अत्यावश्यक वस्तू असलेले पेट्रोल, डिझेल आदी स्फोटक पदार्थ विक्रीस ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी छापा टाकून एक लाख दोन हजार ८२६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून प्रवीण सिद्धेश्वर पाटील (वय २४), रमेश सिदमल बगले (वय २८, रा. नंदूर) या दोघा किराणा दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चौथ्या घटनेत सिद्धेवाडी येथून मंगळवेढा शहराकडे बेकायदा वाळू घेऊन येणारे वाहन पोलिसांना पाहताच सुसाट वेगाने माघारी पळून जात असताना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ते वाहन पकडून तीन लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, बेकायदा वाळू वाहतूक प्रकरणी अभिषेक संतोष रणदिवे (वय २१, रा. अनवली) व अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवेढा ही संतांची भूमी असून, मागील काही दिवसांमध्ये अवैध दारू, मटका, गुटखा व खासगी सावकारकीचे फार मोठे प्रस्थ पसरले होते. त्यामुळे अशा पोलिसी कारवाईचा धाक कायमस्वरूपी बसणे काळाची गरज आहे; अन्यथा समाजाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. फक्त प्रशिक्षणार्थी अधिकारी आल्यानंतरच अशा कारवाई मोठ्या प्रमाणात होतात, पण कायमस्वरूपी अधिकारी आल्यानंतर अशी कारवाई होत नाही, याचाही विचार होणे गरजेचे आहे. निवेदने देऊन, आंदोलने करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यापेक्षा स्वतःची जबाबदारी म्हणून कारवाई करणे गरजेचे आहे.

- सतीश दत्तू, अध्यक्ष, वारी परिवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT