पत्नीकडे पाहू नये यासाठी पतीने चक्क नाभिकाला बोलावून २० वर्षीय पत्नीचे टक्कल  sakal
सोलापूर

Solapur : पत्नीकडे कोणत्याही पुरुषांनी पाहू नये म्हणून तिचे केले मुंडन

सकाळ वृत्तसेवा

शिवाजी भोसले

सोलापूर : फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रीचा सन्मान अक्षरश: चुलीत घातला जातोय अशीच धक्कादायक आणि गंभीर प्रकार सोलापुरात घडला आहे. आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊ नये, म्हणून एका तरुणाने चक्क न्हाव्याला घरी बोलावून तिचे मुंडन केले. एवढेच नव्हे तर तिला महिनाभर खोलीत डांबून ठेवले. तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्णपणे घाला घातला.

याप्रकरणी सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पिडीत महिलेची स्टोरी ऐकून पोलीसदेखील चक्रावले.दरम्यान गंभीर प्रकरणाची दखल घेऊन यातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे पोलिसांना सांगितले आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. या घटनेचे तीव्र पडसाद सोलापुरातील समाजमनावर पडले आहेत दोषीं अक्षरशः संतापाची लाट उसळी आहे.

परपुरुषाने आपल्या पत्नीकडे पाहू नये यासाठी पतीने चक्क नाभिकाला बोलावून २० वर्षीय पत्नीचे टक्कल केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही ऐकून थक्क झाले.

पीडित हिचा विवाह जोडबसवण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणाशी मे महिन्यात झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच पतीने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. सासरकडील मंडळी हार बनवण्याचा व्यवसाय करत असून सगळेजण तिला एकटीला घरी कोंडून व्यवसायासाठी जात होते. तरीही तिच्यावर नवरा संशय घेत होता. यातूनच पतीने संशय घेत तिला तुझे केस मला आवडत नाहीत,असे म्हणत तिला केस काढून टक्कल करायचे असल्याचे सांगितले.

हे ऐकताच पत्नीने साफ नकार दिला, पण त्यानंतर पतीने रागाच्या भरात तिच्याशी बोलणे बंद केले. इतकेच नाही तर जेवण न करणे मारहाण करणे अशी वागणूक सुरु केली. यामुळे पीडितीने मनावर दगड ठेवून केस कापण्यास होकार दिला. केस कापण्यासाठी नाभिक आल्यानंतरही त्यावेळी अगोदर तिने विरोध केला नंतर नाईलाजाने ती शांत राहिली, अशी माहिती पीडितेच्या आईवडिलांनी दिलीय.

दरम्यान,पीडितेच्या पतीने बाहेरून नाभिकाला बोलावून पत्नीचे केस पूर्णतः काढून टाकले. हा प्रकार पीडितेने आपल्या माहेरी सांगितला नाही. काही दिवसानंतर माहेरच्या लोकांनी कार्यक्रमानिमित्त पीडितेला व जावयाला घरी बोलावले. त्यावेळी पतीने पीडित पत्नीला घरी नेऊन सोडले. त्यावेळी पीडितेने आपल्याबरोबर झालेली घटना आई-वडिलांना सांगितली.

यानंतर तरीही पीडितेच्या आई-वडिलांनी मुलीला सासरी नांदविण्यासाठी घेऊन जातील असे वाटून याची तक्रार केली नाही, पण २२ दिवसानंतरही पतीने पीडितेच्या कुटुंबीयांचे फोन घेणे टाळले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्यासाठी जेलरोड पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी पीडित महिलेची विचारपूस केली. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कलीम चौधरीवर याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT