सोलापूर : ‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असं संत तुकाराम महाराज यांनी म्हटलं होतं. त्यात बदल करता, ‘उजाड माळरानावर अंजीरची मधूर फळे गोमटी’ असं नव्यानं म्हटलं जाऊ लागलं आहे. दुष्काळानं गलितगात्र झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याच्या उजाड माळरानावर आता वेगळी ‘किमया’ साधली गेलीय. इथं आता चक्क अंजीराच्या बागा फुलल्यात. अडचणीत आलेल्या इथल्या डाळिंब पट्ट्याला आता अंजीराचा गोडवा लागला जावू लागलाय. अंजीर फळाच्या शेतीचा भन्नाट प्रयोग आता इथल्या काही युवा शेतकर्यांनी यशस्वी केलाय. नजिकच्या काळात इथं डाळिंबऐवजी ‘अंजीरचा कॅलिफोर्निया’ नव्यानं उदयास येऊ शकतो.
विशेषत्वे, आयुर्वेदामध्ये डाएट मानलं जाणार्या अंजीराचं सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन भविष्यात झाल्यास अंजीर ताजं खाण्यासाठी बाजार पेठेत पाठविण्याबरोबच सुक्या अंजीराची प्रक्रिया, अंजीराचा बेदाणा आणि विविध औषधांमध्ये उपयोग या सगळ्या आघाड्यांचा विचार करता अंजीर शेतीमधून सोलापूर जिल्ह्याचं अर्थकारण नजिकच्या काळात प्रचंड वाढू शकतं. डाळिंबाऐवजी अंजीर शेतीचा नव्याने आलेला पर्याय हा जणू जिल्ह्याच्या अर्थकारणासाठी भविष्यात जादूई झुप्पी ठरला तर नवल वाटायला नको हे मात्र निश्चितच.
काही ठळक नोंदी ...
* मर आणि तेल्याच्या प्रार्दूभावातून डाळिंब बागा उध्दवस्त झाल्याने अंजीर शेतीकडे शेतकर्यांचा कल
* अंजीर शेतीला सांगोला तालुक्यातील पर्यायाने सोलापूर जिल्ह्यात पोषक वातावरण
* सांगोला तालुक्यातील यशस्वी प्रयोग पाहून शेतकर्यांनी धाडसाने वळावं अंजीर शेतीकडं
* अंजीर शेती म्हणजे अवघी 30 गुंठे क्षेत्र, 30 ते 40 हजार खर्च आणि 4 महिन्याचे 6 लाखाची कमाई
अंजीर फळ शेतीच्या यशाचं गमक तरी काय?
* एकदा बाग लावल्यानंतर तब्बल 30 वर्षे टिकते
* ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत विक्रीतुन शेतकर्यांच्या हाती खुळखुळतो पैसा
* पिकाला पाणी कमी लागते, फवारण्या अत्यंत कमी
* फळाला मिळणारा दर निश्चत
* प्रतिकिलो 70 ते 120 रूपयांपर्यंत मिळतो भाव
* सेंद्रीय पध्दतीने पिकाची जोपासणा केली तर 30 टक्यांपर्यंत जादा उत्पादन
* मजुरावर शुन्य टक्के खर्च
* सोलापूर जिल्ह्यात स्थानिक बाजार पेठेतच पुरत नाही माल विकायला
* रासायनिक किंवा सेंद्रीय खतांचा या पिकासाठी अत्यंत कमी खर्च
अंजीर शेतीला भवितव्य काय?
सांगोला तालुक्यातील डाळिंब पट्टा समजल्या जाणार्या शिरभावी, धायटी या परिसरात अंजीरच्या बागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या बागांमधून निघणारा माल जिल्ह्यालाच पुरत नाही. भविष्यात जादा उत्पादन निघाल्यास मुंबई, बंगळुरु, हैदराबाद, दिल्ली, पुणे या बाजारपेठांमध्ये माल नेता येईल. अंजीरपासून बेदाणा तयार करण्याचे मोठे उद्योग या भागात होऊ शकतात.
अंजीरच्या बेदाण्यातून प्रचंड उज्वल भविष्य
बाजार पेठेत सध्या अंजीरच्या बेदाण्याचा भाव प्रतिकिलोला 1200 ते 1400 रुपये आहे. सांगोल्यासह जिल्ह्यात अन्य ठिकाणी उत्पादीत अंजीर फळांवर बेदाण्याची प्रक्रिया करण्याचे उद्योग शेतात उभारता येतील. द्राक्ष बेदाण्याप्रमाणे शेतातच अंजीरापासून बेदाणा तयार करण्याचे शेड शेतकरी उभा करु शकतात, सांगोल्यात त्यादृष्टीने आता प्रयत्न सुरु झाले आहेत. हा प्रयोग नक्की यशस्वी होऊ शकतो. सर्व खर्च वजा जाता एकरी 12 ते 15 लाखांपर्यंत कमाई शेतकर्यांना अंजीर बेदाणा शेतीमधून होऊ शकते. आयुर्वेदामध्ये अंजीरला डायएटचा खजीना मानले गेले आहे. अनेक औषधांमध्ये अंजीरचा उपयोग केला जातो, सोलापूर जिल्ह्यातील अंजीर हे औषधांच्या निर्मितीत जाऊ लागल्यास या जिल्ह्याचे मोठे अर्थकारण वाढणार आहे.
अंजीर बेदाणा प्रकल्प उभारण्याचा मानस
सन 2012 मध्ये ‘पुणे फीग’ या वाणची अंजीर बाग लावली. अत्यंत कमी खर्चात, शुन्य मजूर खर्चावर अवघ्या 30 गुंठ्यात 4 महिन्याला 6 लाखाचे उत्पन्न मिळत आहे. शेतकर्यांनी या पिकाकडे वळले पाहिजे. डाळिंब बाग काढूण हे पिक घेतले. या पिकावर शेती, प्लॉट, महागाडी इंग्रजी माध्यमांची मुलांची शिक्षणं अंजीर बागेच्या उत्पनावर केली. भविष्यात अंजीरपासून बेदाणा तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंब पट्टा आता अंजीर बागांचा पट्टा होईल.
- अनिकेत जगदाळे, अंजीर उत्पादक, शिरभावी, ता.सांगोला
अंजीर खाणे वरदान;वाढली मागणी
* आयुर्वेदात अंजीराचा उपयोग डाएटमध्ये करण्याचा सल्ला
* अंजीर खाण्यानं वजन कमी राहण्याबरोबरच, पचनशक्ती राहते सुरळीत
* कफ आणि ब्लड शुगर नियंत्रीत राहण्यास अत्यंत होते मदत
* डायबिटीज आजारावरदेखील अंजीर ठरते गुणकारी
* कोलेस्टेरॉल फ्री असलेले उंबरवर्गीय फळ
* मानवाला हेल्दी आणि फिट ठेवण्याचे अनेक गुण अंजीरात
* अंजीरात लोह, कॅल्शिअम, फॅास्फरस, फायबर्स, व्हिटॅमिन अ आणि सी भरपूर प्रमाणात जे आरोग्यासाठी उत्तम
अंजीर खाण्याचे डॉक्टरांनी हे पण फायदे सांगितले
* बध्दकोष्ठता होते दुर, पित्त कमी होते, थकवा दुर होतो,रक्ताचे वाढते प्रमाण
* त्वचा विकार होतात कमी, तोंड आल्यावर पडतो आराम, दमा, खोकला होतो कमी
* मधूमेही रुग्ण ताजे खाऊ शकतात अंजीर, मात्र सुके खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा घ्यावा सल्ला
अंजीर खावे तरी कधी?
* सकाळी उपाशीपोटी अंजीर खाणं सर्वात उपयोगी, रात्री झोपण्यापुर्वी दोन अंजीर खाणं अधिक फायदेशीर, डायफु्रटस म्हणून तर अंजीर केव्हाही खाता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.