corona sakal
सोलापूर

सोलापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर

मुंबई, ठाणे, पुणे, नगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना आता राज्यातून परतीच्या वाटेवर आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील तब्बल आठ कोटी संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ७८ लाख ७४ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. सर्वात दु:खद बाब म्हणजे या विषाणूने अनेक कुटुंबातील कर्ता हिरावून नेला. तर अनेक चिमुकल्यांना पोरकं तर अनेक मातांना विधवा केलं. काही वृद्ध माता-पित्यांचा आधार हिरावून नेला. मार्च २०२० पासून आतापर्यंत एक लाख ४७ हजार ७८९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण, आता नऊ जिल्हे कोरोनामुक्त झाले असून १७ जिल्हे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.

राज्यात सध्या ९२१ सक्रिय रुग्ण असून मुंबई, ठाणे, पुणे, नगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पण, प्रतिबंधित लसीमुळे बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू झाले. त्यानंतर एकापाठोपाठ तीन लाटा येऊन गेल्या. तत्पूर्वी, सुरवातीला १८ वर्षांवरील व्यक्तींसह पूर्वीचे गंभीर आजार असलेल्यांना लस टोचण्यात आली. त्यानंतर आता १२ वर्षांवरील प्रत्येकाला लस टोचली जात आहे. त्यातून कोरोना आटोक्यात आला असून त्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलिस, आशासेविका, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राज्यातील सर्व निर्बंध उठल्यानंतर सर्वांनी एक मोकळा श्वास घेतला आहे. अनेकजण परगावी जात असून बहुतेक लोक कुटुंबीयांसमवेत खरेदीसाठी बाजारात येत आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सध्या ९८.११ टक्के आहे.

राज्यातील कोरोनामुक्त जिल्हे...

राज्यातील भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदुरबार हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, धुळे, जालना, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हे १७ जिल्हे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्या प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षा कमीआहे.

ठळक बाबी...

  • कोरोना काळात आतापर्यंत आठ कोटी संशयितांच्या पार पडल्या चाचण्या

  • आतापर्यंत राज्यातील ७८ लाख ७४ हजार ३९४ जणांना झाली कोरोनाची बाधा

  • कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील एक लाख ४७ हजार ७८९ रुग्णांचा झाला मृत्यू

  • राज्यात सध्या कोरोनाचे ९२१ रुग्ण असून मुंबई, ठाणे, पुणे, नगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

  • नऊ जिल्हे कोरोनामुक्त झाले असून १७ जिल्ह्यांतूनही कोरोना परतीच्या वाटेवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT