सुकामेवा sakal
सोलापूर

Solapur : सर्वांनाच हवा ऊर्जादायी सुकामेवा

आबालवृद्धांसाठी फायबर, अँटिऑक्सिडंट, प्रोटीनसह पोषणाचा खजिना

प्रकाश सनपूरकर

सोलापूर, ता. १२ : थंडीच्या वाढत्या जोरासोबत ऊर्जादायी सुकामेवा हे विशेष आकर्षण बनत आहे. सुका मेव्यापासून आबालवृद्धांना ऊर्जा देणारे लाडू, वड्यासह अगदी कच्चा खाण्यासाठी देखील सुका मेव्याचा वापर करता येतो.

हिवाळाभर सुका मेव्याचा बाजार हंगाम अगदी उंचावलेला असतो. सुक्या मेव्यामध्ये सूक्ष्म पोषक, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. ड्रायफ्रूट्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शरीराला फायबर आणि पोषक तत्त्वांचा पुरवठा करतात आणि त्यांच्यापासून भरपूर अँटिऑक्सिडंट्स देखील मिळतात. पण, सुक्या मेव्यामध्ये जास्त प्रमाणात साखर आणि कॅलरीजचे सेवन केल्यास शरीराला हानी पोचते. म्हणूनच सुकामेवा मर्यादित प्रमाणात खावा.

आरोग्याबाबत जागरूकता

सुका मेव्याचे विक्रेते मुकुंद भट्टड सांगतात की, यावर्षी सुका मेव्याचा हंगाम अगदी जोरात सुरू आहे. पण दर मागील वर्षीएवढेच स्थिर आहेत. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांची मागणी वाढत चालली आहे. आरोग्यविषयक जागरूकतेचा परिणाम आता बाजारपेठेतही दिसून येत आहे. सर्व सुका मेव्यांच्या प्रकाराला सारखीच मागणी असते.

दूध व सुका मेव्याचा अमृतसंगम

आहारतज्ज्ञ हेमा मुलगे सांगतात की, सुका मेव्यामध्ये व्हिटॅमिन ई असते. हे व्हिटॅमिन शरीरात कॅल्शिअम स्थिर करण्यास मदत करते. दुधात भिजवलेला सुका मेवा किंवा सुका मेव्याची पावडर करून दुधात घेणे हे उपयुक्त असते. दुधातील कॅल्शिअम व सुका मेव्यातील व्हिटॅमिन ई एकत्रितपणे प्रभावी ठरतात. याशिवाय काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुके हे रात्रभर भिजवून ठेवल्यानंतर सकाळी उपाशीपोटी खाणे फायदेशीर असते.

नैसर्गिक साखरेचा साठा

सुक्या मेव्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीज जास्त असतात. म्हणजेच त्यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्ही असतात. मनुक्यांमध्ये ५९ टक्के, खजूर ६४ टक्के, जर्दाळू - ५३ टक्के आणि अंजीरमध्ये ४८ टक्के साखर असते.

परंपरा शरीर संवर्धनाची

तरुण वयात तालीम, खेळ आदींचा सराव करताना सुका मेव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुळातच सध्या कृत्रिम फूड सप्लिमेंटला उत्तम पर्याय भारतीय परंपरेतून सुका मेव्याने दिला आहे. हिवाळ्यात सुका मेव्याचा आहार उपयुक्त आहे. तसेच बदाम, मनुका हे पाण्यात भिजवून खाण्याची परंपरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT