mahavitaran sakal
सोलापूर

मंगळवेढा : वीजपुरवठा खंडित; महावितरण धोरणाने शेतकरी देशोधडीला

शेतीपंपाच्या थकीत वीज बिलावरून वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत महावितरणची ताठर भूमिका

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : शेतीपंपाच्या थकीत वीज बिलावरून वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत महावितरणने ताठर भूमिका घेतली असून त्या विरोधात शेतकऱ्यांची भूमिका देखील ताठर होत चालली असताना विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून राजकीय उणीदुणी काढण्याच्या नादात शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष झाले.

गेल्या काही वर्षापासून महावितरणकडून शेतकर्‍यांना शेतीपंपाचे बिल मोघम दिले जात आहे उलट त्या वीजबीलाची वसुली दर तीन महिन्याला ठराविक रकमेची वसुली केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे बिल किती भरले किती याचा ताळमेळ लागत नाही आणि शेतकऱ्याकडे पिकातून पैसे येण्याच्या वेळेस महावितरण कडून वीज पुरवठा थेट सबस्टेशन मधून खंडित केला जात असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके शेतकऱ्यांना वाया सोडावी लागत आहे. साखर कारखान्याकडील ऊस बिल देखील अद्याप मिळाली नाहीत त्यामुळे शेतीपंपाचे बिल कसे भरायचे असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर राहिला आहे.

डिसेंबर महिन्यामध्ये महावितरणने काही शेतकऱ्याकडून ठराविक रक्कमेची वसूली केली त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल दिले त्याचाही वीज पुरवठा सरसकट खंडित करण्याचा तुघलकी कारभार सध्या जिल्ह्यात सुरू आहे. या विरोधात फक्त शेतकरी संघटनेकडून आवाज उठवून देखील याकडे महावितरणने गांभीर्याने घेतले नाही. स्व आ भालकेच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या पालकत्वाची जबाबदारी घेतलेल्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी आणि महावितरण यांच्यात योग्य समन्वय साधण्याची आवश्यकता असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष करत जिल्ह्यात पक्ष वाढीबरोबर इंदापूरच्या प्रश्‍नाकडे लक्ष दिल्यामुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले.

डिसेंबरमध्ये ज्याप्रमाणे मध्यस्थी केली तशीच मध्यस्ती यावेळी देखील करण्याची आवश्यकता आहे तालुक्यामध्ये बोराळे, ब्रह्मपुरी या सबस्टेशन मध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ठिय्या आंदोलन करून देखील अधिकाऱ्यांची भूमिका ताठर अजूनही राहिली आहे. सिद्धापूर ग्रामपंचायत ने ऊर्जा मंत्र्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मारापूर येथील जळलेला ट्रान्सफर नेण्याची भूमिका देखील महावितरणने घेतली नाही.

शेती पंप वीजेबातच्या समस्या

महावितरण कडून शेतकऱ्यांना वीज बिले दिले जात नाहीत ज्या शेतकऱ्याकडे मिटर आहे त्या मीटरची रिडींग घेतले जात नाही शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या तारांची उंची न वाढवल्यामुळे शॉर्टसर्किटने ज्या घटना घडल्या त्या कडे महावितरणचे दुर्लक्ष केले वीज बिलासाठी प्रती शेतकय्रा ऐवजी सरसकट शेतकऱ्याने बिल भरा अशी आग्रही मागणीमुळे या एका ट्रान्सफर सर्व शेतकऱ्यांमध्ये एकमत होणे अशक्य आहे. दर तीन महिन्याला बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने वीज पुरवठा खंडित करून त्याच्या पिकाचे नुकसान केले जात आहे.असे न करता ज्याने बिल भरले नाही त्याचाच वीजपुरवठा खंडित करण्याची भूमिका का घेतली जात नाही. विजेच्या दुरूस्ती व बिलातील तांत्रिक दोषासाठी शेतकऱ्यांना महावितरणच्या अधिकाऱ्याकडून सहकार्य केले जात नाही.

राज्यातील सरकार विरोधी पक्षाचे आ. समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यां बाबत तालुक्यातील परिस्थिती विचारात घेऊन 26 नोव्हेंबर 2021 रोजीच्या मोर्चात महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले मात्र अधिकाऱ्यांच्या शेतकर्‍याबद्दल च्या वागण्यात काहीच बदल नसल्याचे सद्यस्थिती वरून दिसून येत आहे.

मार्च अखेरीस सर्वांची देणे द्यावे लागत असताना महावितरणने

शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने वीजबिल आकारणी करत महत्त्वाच्या प्रसंगी वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचा घाट महावितरणने घातला असून अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या संकटात जावे लागत आहे

- शंकर संघशेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT