Solapur News_Funeral procession 
सोलापूर

Video: पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा; अंगावर शहारे आणणारं दृश्य

हरणा नदीला पूर आल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल

सकाळ डिजिटल टीम

अक्कलकोट : सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा निघाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पूरस्थितीमुळं इथल्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Solapur Funeral procession through flood waters Shocking video goes viral)

पितापूर गावातील एका मुस्लीम कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं पण या भागात मुसळधार पाऊस सुरु असल्यानं हरणा नदीला पूर आला आहे. अंत्ययात्रा काढण्यासाठी पर्याय नसल्यांनं नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी अक्षरशः आपला जीव धोक्यात घालत नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. पाण्याच्या बॅरलवर पार्थिव ठेऊन पुराच्या पाण्यातून ही अंत्ययात्रा काढण्यात आली.

नागरिकांना मुलभूत गरजांना वारंवार झगडावं लागत आहे. या नदीवर पूल व्हावा अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. स्थानिक नेत्यांनी अनेकदा ग्रामस्थांना आश्वासनं दिली मात्र आत्तापर्यंत पूलाचं काम झालं नव्हतं. पण महिन्याभरापूर्वी या नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मंजूर झाला असून त्यासाठी निधीलाही मंजुरी मिळाल्याचं सूत्रांकडून कळते.

दरम्यान, मुलभूत पायाभूत सुविधा नसल्यानं स्थानिकांना साध्या व्यवहारांसाठी देखील या नदीतूनच प्रवासा करावा लागतो. त्यातच आता हे अत्यंयात्रेच विदारक दृश्य समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: एक्झिट पोल येताच देवेंद्र फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला; संघ मुख्यालयात खलबतं

Sports Bulletin 20th November : भारतीय क्रिकेटपटूंनी बजावला मतदानाचा हक्क ते लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी पुन्हा भारतात येण्याची शक्यता

Exit Poll: महाराष्ट्राचा महानिकाल! भाजपच राहणार सर्वात मोठा पक्ष, पण सरकार...; एक्झिट पोल्स काय सांगतात? जाणून घ्या

Exit Poll : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाला मिळणार जास्त जागा? Chanakya Strategy Exit Poll काय सांगतो?

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

SCROLL FOR NEXT