Solapur Highway Traffic - मांजरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरू असल्याने पुण्याहून सोलापूर कडे जाणारी वाहतूक थेऊर येथून नगर महामार्गाकडे वळविण्यात आली आहे. सोलापूरकडे जाणारी अनेक जड वाहने व स्थानिक वाहनांना वळविलेली वाहतूक सोयीस्कर नसल्याने ती जागेवरच अडकून पडली आहेत.
त्यामुळे येथील द्राक्ष संशोधन केंद्र ते थेऊर फाट्यापर्यंत ठीक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक आदींना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कवडीपाट टोल नाक्यापासून द्राक्ष संशोधन केंद्र जवळील भापकर मळा चौकापर्यंत सोलापूरच्या दिशेने सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे.
त्यामुळे ही कोंडी वाढत जाऊन थेट हडपसर येथील पंधरा नंबर चौकापर्यंत गेली होती. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, कामगार, व्यावसायिक यांना ठिकठिकाणी कोंडीत अडकून पडावे लागत आहे. अनेक वाहने अंतर्गत रस्त्यावर घुसल्याने तिकडेही कोंडी होत आहे.
सध्या हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडून ठीकठिकाणी वाहतूक नियंत्रण कर्मचारी उभे करून नियंत्रणाचे काम केले जात आहे. मात्र, थेऊर फाट्यावर वाहतूक वळविल्याने त्या पुढील स्थानिक वाहने अडकून पडली आहेत.
यवत पर्यंत जाणारी वाहने सोडण्याची विनंती करूनही पोलिसांकडून ती सोडली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या कोंडीत दोन रुग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या. पो
लिसांनी पालखी पर्यंतच्या गावाजवळील स्थानिक वाहने सोडण्यास काही हरकत नाही. त्यामुळे मागील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. पालखी महामार्गावर असल्याचे माहीत असतानाही कात्रज कोंढवा, खराडी व मुंबई महामार्गावरून सोलापूर कडे जाणारी जड वाहने पोलिसांनी या महामार्गावर सोडलीच कशी, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
पोलिसांचे नियोजन नसल्याने आम्हाला त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार गणेश धुमाळ, संदेश चौधरी, राजेश वाघ, राजन दिवेकर, दिनेश आंबेकर, प्रल्हाद कुंजीर यांनी केली आहे.
दुपारीही कोंडी होण्याची शक्यता :
येथील अण्णासाहेब मगर बाजार समितीचा बाजार दोन वाजता फूटत असतो. यावेळी शेतकरी, व्यापारी व ग्राहकांची वाहने मोठ्याप्रमाणात रस्त्यावर उभी असतात. आगोदरच महामार्गावर दोन दिवस कोंडी होत असताना बाजारसमितीमध्ये येणाऱ्या वाहनांमुळे महामार्गावर कोंडी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"थेऊर फाटा येथून सोलापूर कडे जाणारी वाहतूक नगर महामार्गाकडे वळविली आहे. अवजड वाहने त्या रस्त्याने जायला तयार नसल्याने जागेवरच बाजूला थांबली आहेत.
त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी कोंडी होत आहे. मात्र, विचारपूस करून स्थानिक हलकी वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे. उद्या पालखी सोहळा रोटी घाटाकडे वळाल्यानंतर महामार्गावरील सर्व वाहतूक सुरळीत होईल.'
सुनील जाधव. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा हडपसर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.