Solapur News sakal
सोलापूर

Solapur News: कलेसाठी कला की जगण्यासाठी कला यावर संशोधन गरजेचे

Solapur News: मानवता ही वर्गात शिकवण्याची बाब नाही.ती साहित्यातून मानवी, वर्तनातून वृद्धिंगत व्हावी लागते

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : मानवता ही वर्गात शिकवण्याची बाब नाही.ती साहित्यातून मानवी, वर्तनातून वृद्धिंगत व्हावी लागते.

समाजाच्या समस्या समजावून घेणे म्हणजे मानवतेचे मूल्य वृद्धिंगत करणे होय.म्हणून पूर्वी कलेसाठी कला असे होते आता जगण्यासाठी कला हे सूत्र लक्षात घेऊन संशोधन होणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मानव्यविद्याशाखेचे माजी प्रमुख डॉ. अशोक चास्कर यांनी व्यक्त केले.

येथील श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये मानव्यशास्त्र, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील आधुनिक प्रवाह या विषयावरील एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी प्राचार्य डाॅ.एन.बी.पवार,रतनचंदशहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा,सचिव अॅड रमेश जोशी, किसनराव गवळी,बाबासाहेब पाटील,प्रा.संजय शिवशरण, प्रा.एन. आर. जगताप,नातेपुते कॉलेजचे प्राचार्य डॉ.सी.बी.कोळेकर, उपप्राचार्य प्रा.सदाशिव कोकरे उपस्थित होते.उदघाटनप्रसंगी बोलताना

डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की,ग्रामीण भागात अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. तिथल्या गरजा लक्षात घेऊन आपले प्रश्न आपण सोडवून घेण्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे.

अध्यक्षस्थानवरुन बोलताना रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा म्हणाले की पर्यावरणाच्या दृष्टीने संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. औद्योगीकरण,तंत्रज्ञानाचा बेसुमार वापर याच्यामुळे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. (Latest Solapur News)

त्याच्यावरती संशोधन होणे गरजेचे आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट पुणेचे डायरेक्टर प्रोफे. डॉ.पराग कालकर, म्हणाले या पुढील काळात मानव्यविद्याशाखा, कॉमर्स मॅनेजमेंट आणि सायन्स या क्षेत्रात सर्व काही ऑनलाईन पद्धतीने होईल पुढील काळातील शिक्षण, व्यवहार बाजारपेठ, वैद्यकीय सेवा सुविधा यातील मोठ्या प्रमाणात ऑनलाईन होतील.गव्हर्नमेंट कॉलेज मनाली ज्.िबिदर (कर्नाटक)

चे इंग्लिश विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत मोहनराव म्हणाले की,तंत्रज्ञान आणि साहित्य एकत्र आले तर तंत्रज्ञानाला मानवी चेहरा लाभेल, साहित्य अधिक समजून घेण्यासाठी आणि कला विकसित होण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रोफे.डॉ. जी.बी.कोळेकर म्हणाले की,संशोधनासाठी आवश्यक सोयी सुविधा आणि संशोधन संस्कृती निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नवे शैक्षणिक धोरण खूप चांगले असले तरी त्याचा प्रत्यक्ष वापर उपयुक्तवादी धोरणातून करायला हवा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सायन्स फॅकल्टीचे डीन डॉ. शंकर नवले म्हणाले की,सायन्स, तंत्रज्ञान इंजिनिअरिंग मानवी विद्या या सर्व शाखा परस्परांवर अवलंबून आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील विविध संशोधनाच्या संधी शोधून त्यातील आव्हाने स्वीकारली पाहिजेत.

दयानंद कॉमर्स कॉलेजचे कॉमर्स विभाग प्रमुख डॉ.एस.व्ही.शिंदे म्हणाले की पर्यावरण आणि जागतिकीकरण या सध्याच्या काळातील सर्वात मोठ्या समस्या असून त्यांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.(Marathi Tajya Batmya)

अशा आंतरशाखीय चर्चासत्रातून विविध विषयातील संशोधन माहिती मिळते आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासाचा प्रवाह वृद्धिंगत होत जातो.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे मानव्याविद्याशाखेचे

डीन डॉ. सिद्राम सरवदे म्हणाले की, साहित्यातून नव समाज निर्माण होत असतो. माणूस घडवण्याचे काम कला शाखा करते. कला शाखेसमोर खूप आव्हाने आहेत.

त्यांचा स्वीकार करून आपणाला वाटचाल करावी लागणार आहे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रोफे. डॉ. एन. बी.पवार यांनी चर्चा सत्रातील विविध विषयांची मुद्देसूद मांडणी केली. सूत्रसंचालन प्रा.अर्चना कदम, प्रा.कृपाली आवळेकर यांनी तर आभार नॅक समन्वयक डॉ.परमेश्वर होनराव यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT