solapur supriya sule
सोलापूर

Solapur : राज्याची प्रतिष्ठा कमी करण्यात अदृश्‍य हात; निवडणूक आयोगाने मेरिटवर निकाल दिल्यास राष्ट्रवादी आमचीच - सुप्रिया सुळे

सोलापूर शहरातील अल्पसंख्याक मेळाव्यासाठी खासदार सुळे रविवारी (ता.८) सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

सोलापुर - महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात जात आहेत, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसांची शिवसेना आणि आता शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडली. राज्याचे मंत्री, पालकमंत्री कोण असावेत हेही दिल्लीतील लोक ठरवत आहेत. १०५ आमदार निवडून आण्यात ज्यांचे योगदान सर्वाधिक, त्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केले आणि आता सोबतीला दुसरा उपमुख्यमंत्री आणून बसविला आहे. महाराष्ट्राचा मानसन्मान, प्रतिष्ठा कमी करण्यामागे दिल्लीतील अदृश्य हात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत केला.

सोलापूर शहरातील अल्पसंख्याक मेळाव्यासाठी खासदार सुळे रविवारी (ता.८) सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, माजी महापौर महेश कोठे, मनोहर सपाटे, शहराध्यक्ष भारत जाधव आदी उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, भाजप विरोधी पक्ष असला तरीदेखील यापूर्वी स्व.अटलबिहारी वाजपेयी, स्व.सुषमा स्वराज हे नेते खूप चांगले होते आणि लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही चांगले आहेत. मात्र, आता जुन्यांना डावलून भाजपने २.० व्हर्जनचा नवा गट करून वर्षानुवर्षे झटलेल्यांना बाजूला केले जात आहे. दुसरीकडे दिल्लीतील अदृश्य शक्तीने २०१४ मध्ये फडणवीसांना मुख्यमंत्री करून १० गुण दिले, पण आता उपमुख्यमंत्री करून पाच गुण दिले. आता दुसरा उपमुख्यमंत्री शेजारी बसवून त्यांना अडीच गुणांवरच आणले आहे. आता ते गुण शून्य होऊ नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खासदार सुळे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

आरोप करायचे अन्‌ त्यांना पक्षात घेऊन क्लिनचिट देणारे केंद्र व राज्यातील सरकार

शाळा बंद करून तेवढीच दारू दुकाने वाढविण्याचा डाव आखणारे खोके सरकार

शासकीय दवाखान्यातील मृत्यू राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचे बळी

भाजपचा गृहमंत्री होतो, तेव्हा राज्यात गुन्हेगारी विशेषत: महिलांवरील अत्याचार वाढतात

काँग्रेसच्या विचाराचा मुख्यमंत्री व्हावा ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्वागतार्ह

आमची सत्ता आल्यास कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द, बंद शाळा पुन्हा सुरु करू, शेतकऱ्यांना हमीभाव व मुलांच्या शिष्यवृत्ती पुन्हा सुरु होतील

‘वापरा व‌ फेका’ ही भाजपची रणनीती

ज्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्षे खस्ता खाल्ल्या ते लोक आता पक्षात दिसत नाहीत. आरोप करायचे अन्‌ दुसऱ्या पक्षातील लोक आपल्याकडे घ्यायचे, अशी पद्धत भाजपने अवलंबली आहे. ‘वापरा व फेका’ अशी भाजपची सध्याची रणनीती सुरू आहे. माझी उमेदवारी दोन वर्षांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली असून, मी मुक्ताईनगर येथून निवडणूक लढणार आहे, असे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मेरिटवर निकाल झाल्यास ‘सत्यमेव जयते’

राष्ट्रवादी कोणाची? यावर आता निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असताना काहीजण चिन्ह आम्हालाच मिळणार, पक्ष आमचाच असा दावा करीत तारीख देखील सांगत आहेत. पण, परीक्षा होण्यापूर्वी त्या लोकांना निकाल कसा समजतो, ‘दाल मे कुछ तो काला है’ असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मेरिटवर निकाल झाल्यास निश्चितपणे राष्ट्रवादी शरद पवार यांचीच असल्याचा कौल येईल, असा विश्वास व्यक्त केला. पण, दिल्लीतील अदृश्य शक्तीने काहीतरी गोलमाल केल्यास काहीही होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Candidates : मुंबईतील इच्छुक मराठा उमेदवारांची यादी आली समोर; मनोज जरांगे शिक्कामोर्तब करणार का?

लग्नाला 20 वर्षं उलटूनही पंकज त्रिपाठींच्या आईने सुनेला स्वीकारलं नाही ; 'हे' आहे कारण

Sports Bulletin 25th October: भारताला वाचवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरचे प्रयत्न ते आयपीएल लिलावापूर्वी मोठ्या घडामोडींचे संकेत

Diwali Recipe : दिवाळीची स्वच्छता करताना काही रहायला नकोय, तुम्ही घरातील या ठिकाणांची स्वच्छता केली का?

Latest Maharashtra News Updates Live : मनसेच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर; कसब्यातून दिला 'हा' उमेदवार

SCROLL FOR NEXT