crime crime
सोलापूर

सोलापूर : अंध महिलेजवळील ३ वर्षाच्या मुलाचे अपहरण

अंबिका ही अंध असून तिने धान्य मिळेल या आशेने तीन वर्षांच्या चिमुकल्यास सोबत घेऊन त्या महिलेसोबत गेली.

सकाळ वृत्तसेवा

अंबिका ही अंध असून तिने धान्य मिळेल या आशेने तीन वर्षांच्या चिमुकल्यास सोबत घेऊन त्या महिलेसोबत गेली.

सोलापूर - शहरात भीक (Begger) मागणाऱ्या एका महिलेने (Women) तिच्या ओळखीच्या भिक मागणाऱ्या महिलेकडे (अंबिका उर्फ रेश्‍मा) जाऊन शहरातील एक नगरसेवक धान्य वाटप (Grain Distribute) करीत असल्याचे सांगितले. अंबिका ही अंध (Blind) असून तिने धान्य मिळेल या आशेने तीन वर्षांच्या चिमुकल्यास (Child) सोबत घेऊन त्या महिलेसोबत गेली. सिध्दार्थ सोसायटी पाण्याच्या टाकीजवळ (विजापूर वेस) आल्यानंतर त्या अनोळखी महिलेने अंबिकाला त्या ठिकाणी सोडले आणि तिच्या मुलाला घेऊन पसार झाली.

अंबिका व त्या अनोळखी महिलेची यापूर्वी परिचय झाला होता. भिक मागण्याच्या निमित्ताने त्यांची दोन-तीनवेळा भेट झाली होती. ती अंध असून तिला दूरवरील काहीच दिसत नाही. अंबिकाला तीन वर्षाचा छोटा मुलगा असल्याचे त्या अनोळखी महिलेला माहिती होते. काही दिवसांपूर्वी त्या दोघींमध्ये काही कारणास्तव भांडण झाले होते. त्या रागातून तिने अंबिकाच्या लहान मुलाला पळवून नेले असावे, अशी शंका पोलिसांना आहे.

दरम्यान, या प्रकरणी परमेश्‍वर यल्लप्पा मंदल्लू (रा. सिध्दार्थ सोसायटी) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार त्या अनोळखी महिलेविरुध्द गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब सावंत हे करीत आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी पाच ते रात्री साडेअकरा या सुमारास घडल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाच्या त्या महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. लहान मुलासोबत भिक मागितल्यानंतर जास्त भिक मिळेल, यामुळे तिने मुलाचे अपहरण केले असावे, यादृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पोलिसांनी तिचा शोध घेतला. परंतु, अजूनपर्यंत त्या महिलेचा व अपहरण झालेल्या चिमुकल्याचा शोध लागलेला नाही.

भिक मागणाऱ्यांना आवरणार कोण?

शहरातील चौकाचौकात भिक मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये अनेक अनोळखी बेवारस व्यक्‍तींचा मृत्यू झाला. तरीही, त्यांच्या सुरक्षिततेकडे कोणीच पाहिले नसून चौकात भिक मागण्याची पध्दत बंद झालेली नाही. त्यांची जबाबदारी कोणाची, असा हद्दीचा वाद पोलिस व महापालिका प्रशासनात निर्माण झाल्याची चर्चा आहे. हातपाय मोडलेल्या आवस्थेत, अंध असेलले भिकारी पूर्वीपासूनच तसे आहेत की त्यांना जाणिवपूर्वक कोणी तसे बनविले, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Marathi Language Controversy: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा! प्रवाशाला हिंदीत बोलण्याची जबरदस्ती, व्हिडिओ व्हायरल

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

SCROLL FOR NEXT