solapur lok sabha poll 2024 komal dobale put whatsapp status with sharad pawar Sakal
सोलापूर

Solapur Lok Sabha Poll : उमेदवारीवरून नाराजी, ढोबळे कन्येने ठेवला शरद पवाराचा व्हाट्सअप स्टेटस

मनासारखा उमेदवार नसेल तर नोटाचे बटन दाबा मात्र मतदानाचा हक्क बुडवू नका असाही स्टेटस ढोबळे समर्थक या नावाने ठेवला त्यामुळे ढोबळे समर्थकांत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेसाठी भाजपाकडून उमेदवाराच्या शर्यतीत असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या अॅड कोमल ढोबळे-साळुंखे यांना उमेदवारी डावलल्यानंतर त्यांनी चक्क खा.शरद पवारासोबतचा कौटुंबिक फोटोचा व्हाट्सअप स्टेटस ठेवत लावा तर्क असे संकेत देत भविष्यात तुतारी हाती घेण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली.

सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेसाठी भाजपाकडून त्या उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत होत्या काँग्रेसकडून माझ्या काँग्रेस कडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महिलाविरुद्ध प्रणिती शिंदे यांच्या आक्रमक आक्रमकतेसमोर जगणारी तरुण महिला चेहरा द्यावा अशी मागणी भाजपातील काही वर्गाने केली होती,

त्या अनुषंगाने अॅड कोमल ढोबळे या उच्चशिक्षित असल्यामुळे यांच्या नावाचा विचार होईल अशी शक्यता होती मात्र पक्षाने जिल्ह्यातील अनेक इच्छुकांना डावलत माळशिरसचे आ.राम सातपुते यांना उमेदवारी निश्चित केली.

त्यामुळे या मतदारसंघात स्थानिक विरुद्ध उपरा असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता असतानाच उमेदवाराच्या शर्यतीत असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या अॅड कोमल ढोबळे साळुंखे यांनी आपले व्हाट्सअप स्टेटस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत जुन्या काळातील कौटुंबिक फोटो ठेवत लावा तर्क असे संकेत दिले,

तर मनासारखा उमेदवार नसेल तर नोटाचे बटन दाबा मात्र मतदानाचा हक्क बुडवू नका असाही स्टेटस ढोबळे समर्थक या नावाने ठेवला त्यामुळे ढोबळे समर्थकांत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. माजी मंत्री ढोबळे हे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील सर्व लोकांशी व राजकीय पक्षाशी संपर्क होता.

त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वतः किंवा मुलीला संधी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी प्रयत्न केले. मात्र कोमल ढोबळे यांनी देखील बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्या उमेदवारीच्या शर्यतीत होत्या तर दुसऱ्या बाजूला राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडू लागल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार हे आपल्या पक्षाची मोट बांधण्यासाठी आतापर्यंत त्यांनी अनेक जुन्या सहकाऱ्यांना जवळ केले.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे देखील त्यांचे जुने सहकारी आहेत उपमुख्यमंत्री अजितदादाच्या त्रासाला वैतागून राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत भाजपाला जवळ केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या हाकेला साथ देत आपल्या राजकीय गुरु जवळ जवळ जाणार का ?

अशी चर्चा या व्हाट्सअप वर ठेवलेल्या फोटोमुळे निर्माण झाली.अॅड कोमल ढोबळे साळुंखे यांनी तुतारी फुंकल्यास भविष्यात त्याचे पडसाद मंगळवेढा व मोहोळ तालुक्याच्या राजकारणात देखील दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT