सोलापूर - महाराष्ट्रसह,कर्नाटक,आंध्र प्रदेशातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माचणुर (ता.मंगळवेढा)येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला महाशिवरात्रीपासून (ता.18) शनिवार रोजी सुरुवात होत आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता.18)रोजी पहाटे चार वाजता 'श्री ' ची महापूजा तहसीलदार स्वप्निल रावडे व आवताडे शुगर चे अध्यक्ष संजय आवताडे यांच्या हस्ते होईल.
सायंकाळी सात वाजता 'श्री 'च्या पालखीचे माचणुर गावातुन मंदिराकडे आगमन उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील मॅडम व निलाताई आटकळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
नयनरम्य आतिषबाजी शोभेच्या दारुकाम कार्यक्रमाचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते होईल.
रविवार (ता .19)रोजी सायंकाळी सात वाजता पारंपारिक भेदिक गाणी (कलगीतुरा)कार्यक्रमाचे उदघाटन दामाजी शुगर चे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी दामाजी शुगर चे संचालक राजेंद्र पाटील असतील.
तिसऱ्या दिवशी सोमवार (ता.20).दुपारी दोन वाजता कुस्त्याच्या फडाचे उदघाटन व सिद्धेश्वर केसरी प्रदान सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी मा.आमदार प्रशांत परिचारक असतील व भगीरथ भालके यांच्या प्रमुख उपस्थीतीत होईल. मंगळवार (ता.21) रोजी सिद्धेश्वर मंदिर परिसरात भजन व कीर्तन सोहळा चा कार्यक्रम होईल.
यात्रेच्या पाचव्या दिवशी बुधवार ( ता.22) सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजता 'श्री'च्या पालखीचे मंदिरातुन माचणुर गावात मंगल आरती,दीवटया व भजन टाळ मृदंगाच्या गजरात प्रस्थान करीत यात्रेची सांगता व महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.